पान:व्यवहारपद्धति.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५७ २ रे ] । दिनचर्या. दिगंतास पसरली. सेवक असावे तर असे असावे. धन्य तुमची. यासमयीं तुह्मांस उत्तीर्ण काय व्हावें ! महाराजांची आपणावर या हाच अर्थ विशेष. येणेकरून उत्तरोत्तर विजयतेस पावाल, हाच अर्थ स्वामींनीं मनांत आणून प्रसावखें खासा महाराजांचा मंदील, चादरा, पटके, झगे, सुरवारा, व अलंकार कलगी, मोतियांचे तुरे, शिरपेच, कर्णमात्रा, रत्नजडित पदकें, कडीं, हस्तमात्रा, व घोडा एक, व हत्ती एक, मोरोपंत पेशवे व प्रतापराव सरनौबत यांस व लहान थोर सर्व सेवकांस गौरव करून महाराजांनी पाठविला असे. आणि आज्ञा केली जाते जे,—विंधांचे मातबर उमराव, वजीर व इतर लोक जे जखमी व पाडाव झाले असतील त्यांस वस्त्रे व घोडीं देऊन सोडून देणे. ” वरील उता-यावरून गुणग्राहक यजमान कार्यकर्त्या सेवकांचा गौरव करून त्यांस खूषदिल कसे ठेवितात, हैं। ध्यान घेण्यासारखे आहे. पुढे कांहीं कालाने वर नांवाजलेल्या प्रतापराव गुजरास विजापूरकरांकडील सरदार बाहलोळखान, हा महाराजांच्या मुलुखावर स्वारी करून येत असतां, त्यास मारून फत्ते करण्याविषयीं महाराजांनी आज्ञा केली होती. त्याप्रमाणे प्रतापराव यांनी खानास गांठून चौतर्फी फौजेच्या वेढ्यांत कोंडिलें, व त्यास अन्नपाणी