पान:व्यवहारपद्धति.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ . ] दिनचर्या. ५५ बजाविल्यास संतोष, व बिघडल्यास नाराजी दाखवावी, परंतु दुर्भाषण बोलू नये. महत्वाचे काम उत्तम रीतीने पार पाडल्यास नोकराची सेवा अगदीं विफल करू नये. थोडेसे बक्षिस द्यावे, निदान गोड शब्दांनी नावांजणूक तरी करावी. मोठया कार्यकत्र्या माणसाच्या हातून प्रसंगी कार्य बिघडलें तरी, त्याच्या मागील नोकरीवर लक्ष देऊन सबूरी करावी, तथापि हयगय आपल्या ध्यानी आली आहे, असे त्यास भासविल्यावांचून राहू नये. तेजस्वी माणसाच्या हातून प्रमाद घडल्यास तो आपल्या आपणच मेल्यापेक्षां मेला होतो, मग पुनः शब्दाने त्याचे मृतमारण करण्यांत तात्पर्य काय ? असल्या पाणीदार माणसास अल्प दूषणही सहन होत नाही. तो निलाजरें तोंड धन्यास न दाखविता प्रसंगी मरूनही जातो. याविषयी एक ऐतिहासिक गोष्ट ध्यानीं ठेवण्यासारखी आहे. शिवाजी महाराजांच्या पदरी मोरोपंत पेशवे व प्रता १ कृतकृत्यस्य भृत्यस्य कृतं नैव प्रणाशयेत् । फलेन मनसा वाचा दृष्टया चैनं प्रहर्षयेत् ॥ हितोपदेश. २ काव्येतिहाससंग्रहांतील चित्रगुप्तविरथित शिवाजी महाराजांची बखर. पान ८९ ते ९३ पड़!