५४ व्यवहारपद्धति. [ प्रकरण दिलें असतां, नोकर लबाड्या करू लागतात, व जे वेतन किंवा पोटगी द्यावयाची ती वेळच्यावेळी द्यावी. वेतन देण्यास उशीर लावल्यास हलक्या पगाराच्या नोकरांची फार अडचण होते, व त्यापासून प्रसंगी एखादा अनर्थही होण्याचा संभव असतो, हे पक्के ध्यानीं बाळगावें. इतर आश्रितांचीही वृत्ति लोभानें, मोहाने, थट्टेनें अगर लुच्चे लोकांनी सांगितलेल्या चहाड्या ऐकून बंद करू नये. नोकरांस कामें सांगावयाची ती, ज्याचा त्याचा दर्जा पाहून सांगवीं, मोठ्या नोकरास हलकें काम, व हलक्या नोकरास मोठे काम, कधींही सांगू नये. हुकूम करावयाचे ते, धनीपणाचा तोरा दाखवून, किंवा वाजवीपेक्षां फाजील आर्जवाने न करितां, गोड शब्दाने व आपला रुआब राखून करीत जावें. कामकाज चांगले १ कच्चिद्वलस्य भक्तं च वेतनं च यथोचितम् ।) संपातकाले दातव्यं ददासि न विकर्षसि.? ॥ ५०१ सभापर्वः । २ काल।तिक्रमणादेते भक्तवेतनयोभृताः । भतुः (. कुर्वन्ति दौर्गत्यात्सोनर्थः सुमहान्स्मृतः ॥ ५१ ।। ) अ० ५ | ३ कच्चिन्न लोभान्मोहाद्वा विश्रभारप्रणयेन वा । आश्रितानां मनुब्याणां वृत्तं त्वं संरुणरिस वै. ।। ९५ ॥ सभापत्र, अ० ५. ४ कच्चिन्मुख्या महत्त्वेव मध्यमेषु च मध्यमाः । जवन्याश्य जघन्येषु भूत्याः कर्मसु याजिताः ॥ ४४ ॥ सभापर्व, अ० ५...!
पान:व्यवहारपद्धति.pdf/67
Appearance