Jump to content

पान:व्यवहारपद्धति.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ . ] दिनचर्या. ५३ भांग करणारास मुखदुर्बळ, व बढाया मारून खोट आश्वासने देणारास कार्यधुरंधर मानण्याची सांपत रीतच पडून गेली आहे, यामुळे घाणेरड्या माणसाची बडेजाव व चांगल्या माणसाचे मातेरे होते, हे कोणी ध्यानी घेत नाहीं. शेंकैडों मूर्खाच्या ऐवजी एकच शाहणा व हुशार माणूस पद बाळगणे चांगलें, तो संकटकाली जसा उपयोगी पडतो, तसे मूर्खसेवक उपयोगी पडत नाहींत. लुच्चे, चोर, द्वेष करणारे, व मूढ अशी माणसे नोकरीवर कधीही ठेवू नयेत. नोकर ठेवावयाचे त्यांची संख्या, आपणास कोणती कामे करावी लागणार, ह्या गोष्टीचा विचार करून प्रथमतः ठरवावी, आणि आपल्या आद्याप्रमाणे त्यांचे वेतन मुकरर करावे, व ते त्यांजवर सोपविलेल्या कामगिरीच्या अनुरूप असावे. कोणी अडलेला पाहून त्यापासून बहुमोलाचे काम घेऊन वेतन थोडे द्यावे, हा न्याय नव्हे. बहुमोलाचे काम घेऊन वेतन थोडे १ कश्चित्सहसैमूर्खाणामेकं क्रीणासि पण्डितम् । पण्डितो ह्यर्थकृ च्छेषु कुर्यान्निःश्रेयस परम्. ।। ३६ सभा० अ० ५. २ कच्चिन्न लुब्धाभौरा वा वैरिणे वा विशांपते ! । अप्राप्तव्यवहारा वा तव कर्मस्वनुष्ठिताः १ ।। ७८ सभापर्व, अ० ५. | ३ कृत्यानि पूर्व परिसंख्याय सवण्यायव्यये चानुरूपा च वृत्तिम संगृहीयानुरूपान्सहायान् सहायसाध्यानि हि दुष्कराणि. ॥ २४ उद्योग, अ० ३७."