७ वें.] शिष्टाचार व द्रव्यविनियोग. २५५ लोकांकडून विद्वानांस जो आश्रय मिळतो, तो फक्त डामडौलाकरितां व त्यांच्या मुखानें आपलें स्तुतिस्तोत्र ऐकण्याकरितांच मिळतो. हा प्रकार चौरीचा उपयोग धुरळा झाडण्याकडे करण्यासारखाच असमंजसपणाचा नव्हे काय ? विद्या हे मनाचे भूषण आहे. तिच्या योगानें मनांस शोभा येते, कार्य व अकार्य यांतील तारतम्य समजते, व दुर्दैवाने विपत्काळ प्राप्त झाला असता, तशा काळांतही तिच्या योगाने मनास विनोद होतो. जी कीर्ति, लक्ष्मी, शोभा, व सुख देणारी विद्या, तिच्या संपादनाकरितां द्रव्य खर्च करणे, हा इतर सर्व प्रकारच्या सुखोपभोगांत सर्वोत्कृष्ट सुखोपभोग समजेल तोच पुरुष शहाणा होय. जो तुच्छ सुखोपभोगांस महत्व न देता, विद्याजन्य सुखानंदास महत्व देतो, तोच विवेकी ह्यांत संशय नाहीं. * शाहणा कोणास ऋणावें, व मूर्ख कोणास सणावे, याविषयी उल्लेख दासबोधादि अनेक ग्रंथांत केलेला सवाँस ठाउकच आहे, येथे त्याची पुनरुक्ति नको. परंतु, ती प्रसंगोपात्त ह्मणून संक्षेपाने तरी येथे थोडी केली पाहिजे. जे प्रशस्त कर्माचे आचरण करितात, व निंद्य १ निषेवते प्रशस्तानि निन्दितानि न सेवते। अनास्तिकः श्रद्दधान एतत्पण्डितलक्षणम् ।।२१। उद्योगपर्व, अ० ३३.
पान:व्यवहारपद्धति.pdf/264
Appearance