Jump to content

पान:व्यवहारपद्धति.pdf/263

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३५४ । व्यवहारपद्धति. [ प्रकरण ज्यांस समजूत आली आहे, अशा जाणत्या मुलांमुलींस जरा डामडौलाचा पोषाख व अलंकार घातले असतां चालेल. श्रीमंत व प्रतिष्ठित लोक स्वतः अलंकार घालून आपले वैभव दाखवीत नाहींत. आश्रित व खिजमतींत असणारे नोकर यांस वस्त्रालंकारांनी भूषित करून आपले वैभव दाखविण्याची त्यांची रीत आहे. बाह्यांगापेक्षा श्रेष्ठ जें अंतरंग त्यास सुशोभित करणे आवश्यक असतां, ते ऑगळ असले तरी सांप्रत श्रीमंत लोकांस परवडते. अंतरंग हे विद्या, विनय, व सद्वर्तन यांनीच सुशोभित दिसते, याकरितां पद एखाद दुसरा विद्वान् व गुणी मनुष्य बाळगून मन सोज्वळ होईल असे करावं. कोठारांत धान्य पुष्कळ आहे, त्याअर्थी एखादा विद्वान् पंक्तीस जेवला ह्मणून कांहीं कमी पडत नाहीं, व सालाच्या कांठीं दानधर्माच्या निमित्ताने पांचपनास रुपये त्यांस पोहचवून त्यांच्या मुखाने आपल्या उदारत्वाची टिमकी जगभर वाजविण्यास हे एक चांगले साधन आहे, एवढ्याच बुद्धीने पदरीं विद्वान् बाळगणे, हा अगदीच गौण पक्ष आहे. वास्तविक सटलें तर विद्वान् व गुणीजन आश्रयास ठेवण्याचा मुख्य उद्देश त्यांजपासून विद्या व गुण संपादन करण्याचा आहे, तथापि या मुख्य उपयोगांकडे लक्ष न देतां, क्वचित् कोठे कोठे श्रीमान्