Jump to content

पान:व्यवहारपद्धति.pdf/265

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३५६ व्यवहारपद्धति. [ प्रकरण कर्मापासून अलिप्त राहतात, आणि आस्तिक्यबुद्धि व धर्मश्रद्धा मनांत बाळगतात, ते शाहणे समजावे. क्रोध, गर्व, उद्धटपणा, आणि अहंता हे दुर्गुण ज्यांचे ठायीं वास करीत नाहींत, जे स्वकार्याविषयीं नेहमीं दक्ष राहतात, आणि ज्यांच्या कार्यास शीत, उष्ण, भय, आनंद, आणि बरावाईट काल ह्यांच्या योगाने अडथळा होत नाही, ते शाहणे होत. जे स्वसामथ्र्यांचा पूर्वी पोक्त विचार करू नच कोणतेही काम हाती घेतात, हाती घेतलेले काम नेटाने पार पाडण्यास झटतात, आणि कर्तव्यापासून कधीही पराङ्मुख होत नाहीत, ते मोठे विचारी पुरुष ह्यांत संशय नाहीं. प्राणिमात्राचा स्वभाव जाणणारा, कोणत्याही कर्माचा परिणाम काय होईल हे बरोबर समजणारा, आणि मनुष्ये आपलीशी करून घेणारा पुरुष पंडित होय. | १ क्रोधो हर्षश्च दपश्च व्हीस्तम्भो मान्यमानिता। यमर्थान्नापकर्षन्ति स वै पण्डित उच्यते ।। २२ ।। | यस्य कृत्यं न विन्नन्ति शीतमुष्णं भयं रतिः ।, समृद्धिरसमृद्भिवा सवै ५ण्डित उच्यते ।। ३४!। यथाशक्ति विकर्षन्ति यथाशक्ति च कुर्वते । न किंचिवमन्वन्त नराः पण्डित बुद्धयः ।। २६ ।। तत्वज्ञः सर्वभूतानां योगज्ञः सर्व कर्मणाम् । उपायज्ञो मनुष्याणा नरः पण्डित उच्यते ॥३१।। उद्योमपर्व, अ० ३३