७ वें.] शिष्टाचार व द्रव्यविनियोग. २५३ यांचे लग्न मार्गशीर्ष मास करणार; त्यास घरांतील बायकांचा बेत सोन्याच्या साखळ्या पाय घालाव्या, याजकरितां श्रीमंत महाराज छत्रपती स्वामींस विनंती करून राणीचे पायांतील सांखळ्या आणवून लग्नसमारंभास पाठवाव्या, ह्मणून राजश्री दिवाकर पुरुषोत्तम यांनी राजश्री सखाराम भगवंत व बाळाजी जनार्दन यांस लिहिले, याजवरून कळलें. ऐशीयास आपलेकडील बायकांचे मनोरथ सिद्धीस न्यावे हे आह्मांसही आवश्यकच; यास्तव महाराजांस विनंती करून दागिने मागविले आहेत, आले झणजे बाबुराव विश्वनाथ याजबरोबर पाठवून देऊ. नवरीस लहान दागिने असावेत ते तेथे आपण करावेत. रवाना छ ५ माहे रमजान बहुत काय लिहिणे लोभ असों दीजे हे विनंती. लेखनसीमा. असो, वस्त्रालंकारांत जसा मर्यादितपणा पाहिजे, त्याप्रमाणेच आहारविहारांतही औचित्य व मर्यादितपणा ठेवणे जरूर आहे. अनुकूलता आहे ह्मणून रोज पक्कानें व रोज गाण्याबजावण्याचे जलसे करणे रास्त नाहीं; असल्या गोष्टी उचित प्रसंगीच केल्या पाहिजेत. तान्हया लेकरांच्या अंगावर पुष्कळ दागदागिना घालण्याचा बायकांस सोस असतो, परंतु त्यापासून लेकरांस सुख न होतां क्वचित प्रसंगी दगा होण्याचा मात्र संभव असतो. १३
पान:व्यवहारपद्धति.pdf/262
Appearance