७ वें. ] शिष्टाचार व द्रव्यविनियोग. २३९ ष्ठितपणाचे अशा लोकांस मान देणे, तो उपायनाप्रमाणे किंवा करभाराप्रमाणे हक्क समजून द्यावा. ज्यांची खानदानी व कुल बघू गेले तर मान देण्यासारखें नाहीं, परंतु आचरण पाहिले तर स्तुत्य, अशा लोकांस संभावनापूर्वक मान. देणे उचित होय, व ज्यांची खानदानी किंवा कुल थोर खरे, पण आचरण सांगण्यासारखें निमेल नाहीं, अशा लोकांस मान द्यावयाचा तो त्यांच्या कुलाकडे बघून व जनरूढीखातर द्यावयाचा असतो, यास्तव तो केवळ औपचारिक रीतीनेच द्यावा, त्यांत अंतरही करू नये, व फारसे स्तोमही माजवू नये. तेलंगे ब्राह्मण फार लांबून आपल्या इकडे येतात, एवढाच विचार ध्यानी घेऊन त्यांच्या विद्वत्तेकडे न बघतां, त्यांस दुप्पट दक्षणा देण्याची जशी कांहीं कालापूर्वी चाले असे, त्याप्रमाणेच वर सांगितलेले तिस-या दर्जाचे शिष्ट हे बडे बापके बेटे आहेत, येवढाच विचार मनांत घेऊन त्यांस मान देण्याची वहिवाट आहे, व ह्या वहिवाटीने त्यांच्या पूर्वजांबद्दल कृतज्ञता दर्शविली जाते, हेही नीटच आहे. कोणाचेही आगतस्वागत करणे ते ज्याचा त्याचा दर्जा ध्यानीं आणून करीत असावे. कोणास चार पावलें सामोरे जाऊन, कोणास खडी ताजीम देऊन, कोणास बसण्यास हाताने स्थाननिर्देश करून, कोणास ।
पान:व्यवहारपद्धति.pdf/248
Appearance