Jump to content

पान:व्यवहारपद्धति.pdf/247

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३८ व्यवहारपद्धति. [ प्रकरण र्वांचा आदर करितात, आपणास जे मिळेल ते सर्व कुटुंबास विभागून देतात, आणि सचवटीने व सरळपणाने वागतात, ते शिष्ट होत. प्राणिमात्रावर दया करणे, कठिण प्रसंगी चंचल होऊन कुमार्गाचे अनुसरण न करणे, व सदोदित बया वाइटाची विचारणा करणे, हा शिष्टांचा लोकमान्य आचार आहे. सदाचाराने वागणे हेच शिष्टपणाचे मुख्य लक्षण खरें, तथापि जनरूढीने तीन प्रकारचे शिष्ट मानले जातात. जन्मानें व कर्माने जे शिष्ट ते उत्तम प्रकारचे, व पहिल्या दर्जाचे शिष्ट समजावे. जे नुसत्या कर्मानेच शिष्ट ते मध्यम, व दुस-या दर्जाचे शिष्ट समजावे. व जे मोठ्या कुळांत जन्म घेतल्यामुळे केवळ जन्मानेच शिष्ट, ते कनिष्ठ तिस-या दुर्जाचे. ह्यांशिवाय इतर लोक ते सामान्यजन होत. अशा चार प्रकारच्या लोकांशीं ज्याच्या त्याच्या योग्यतेनुरूप तफावतीने वागणे भाग आहे. सर्वांचा आदरसत्कार करावा खरा, परंतु तो सर्वांचा सारखा करणे रास्त नाही. ज्यांनी प्रतिष्ठित व खानदानीच्या कुळांत जन्म घेतला असून, ज्यांचे वर्तन परम पवित्र व प्रति| १ तारः संविभक्ता दीनानुग्रहकारिणः । सर्वपूज्याः श्रुतधनास्तथैव च तपस्विनः ॥ ८९ ।। १ वनपर्व. सर्वभूतश्यावन्तस्ते शिष्टाः शिष्टसंमताः । दानशिष्टाः । अ. २०७ सुखांल्लाकानामुवन्तीह च श्रियम् ।। ९० ॥