५ वें. ] देशहित विचार. १८१ लागतो व कोणी तिन्हाईत येऊन तो उकिड आपल्या शेतांत टाकण्याकरितां नेऊ पाहील तर त्यास तो आडवा येतो. सांराश, वस्तूविषयीं प्रेम, लोभ, अभिमान, संग्रहवासना, व रक्षण ह्या गोष्टी त्या वस्तूच्या सुखोत्पादकतेच्या ज्ञानाने होत असतात. ते ज्ञान नसतां नुसते एखाद्या वस्तूस पोपटा सारखे दुस-याच्या शिकवणीबरून माझी माझी झटल्याने वरतीं सांगितलेल्या गोष्टी होणार नाहींत. जनरूढीने लोकांस माझे कुटुंब, माझा गांव, व माझा देश अशी, माझमाझे ह्मणण्याची पोपटपंची शिकविली आहे, तिचा उच्चार मात्र लोक करतात. पण त्यांस ज्ञानाच्या नांवानें आंवळ्या एवढे शून्यच असते. लोकांस कुटुंबव्यवस्थेचे व तज्जनित सुखाचें वरें व पूर्ण ज्ञान असते तर, हल्लीं नवराबायको, बापलेक, व भाऊभाऊ यांमध्ये जो निष्कारण कलह दृष्टीस पडतो, तो न पडता. ग्रामव्यवस्थेचे व तज्जनित सुखाचे पूर्ण ज्ञान असते तर, शेजारीशेजारी एकमेकांचा प्राण घेण्यास उठले नसते. व देशव्यवस्थेचे खरे ज्ञान असते, व ती व्यक्तिमात्राच्या सुखास कारणीभूत कशी होत असते, हे लोकांस सूक्ष्मतने कळते, तर स्वदेशहितास आजच्या प्रसंगी कोणीच उदासीन न राहता. कर्तृत्वाच्या नांवाने पुरें औदासिन्य व सभेतून व चवाठ्यावर पोकळ बडबडीचा गर्गशा जो जिकडेतिकडे ऐकू येतो, त्याचे कारण या संबंधार्ने
पान:व्यवहारपद्धति.pdf/192
Appearance