१८० व्यवहारपद्धति. [ प्रकरण करितो, किंवा ईश्वरकृपेने ते यत्नावांचन प्राप्त झाले असतील, तर त्याबद्दल आनंद मानितो. व अशा सुखोत्पादक पदार्थांच्या संग्रहाविषयींच त्यास अभिमान वाटतो. ज्या वस्तूपासून सुख होत नाही, त्या वस्तूविषयीं कोणासही आपलेपणा व अभिमान वाटत नाहीं. द्रव्य सुखोत्पादक असल्यामुळे त्याचा साठा घरांत झाला की, मी श्रीमान्, मी सुखी, असा मनुष्यास अभिमान वाटू लागतो. पण घरांत उकिड पुष्कळ साचला, झणून त्याबद्दल कोणास अभिमान वाटतो काय ? ह्या उकिड्र्याचा जपर्यंत कांहीं उपयोग दिसत नाही, तोपर्यंत त्याबद्दल कोणासही आपलेपणा वाटत नाही. पण तोच जेव्हां साक्षात् अगर परंपरेने सुखोत्पादक आहे असे ध्यानी येते, तेव्हां त्यावर देखील मनुष्य आपले स्वत्व स्थापित करूं लागतो, त्याजविषयी अभिमान वाहतो, व त्याचे दक्षतेने रक्षण करितो. कोंबड्यास उकिड साक्षात् सुखदायक आहे, ह्मणून तो वाकरीत असतां मध्येंच छाती पुढे करून तो मोठ्या डौलाने ओरडतो. मनुष्यास तो जरी साक्षात् उपयुक्त वाटत नाहीं, तरी आत्म्यास भुक्तिसुख देणारे जें धान्य, ते उत्पन्न करण्यास तो परंपरेने उपयुक्त आहे, असे जेव्हां त्यास वाटते, तेव्हां तो त्याचा देखील आस्थेने संग्रह करितो. त्याजवर आपले स्वत्व दाखवू
पान:व्यवहारपद्धति.pdf/191
Appearance