[ १८२ व्यवहारपद्धति. [ प्रकरण लोकांस अगदी त्रोटक व भ्रामक ज्ञान आहे, हैं होय. जो पर्यंत अनीतीने स्वार्थ संपादन करण्याविषयी मनुध्याचे मन लालचावत आहे, व जों पर्यंत देशहितापेक्षा स्वहिताची किंमत अधिक वाटत आहे, तो पर्यंत त्याने देशहिताविषयी कितीही सूक्ष्मतेने प्रतिपादन केले तरी, त्यास त्याबद्दल हृद्यसंवेद्य खरे ज्ञान झाले आहे, असे ह्मणतां येत नाही. ती त्याची त्रोटक व भ्रामक बडबडच समजली पाहिजे. असले त्रोटक व भ्रामक ज्ञान हे पुन्या अज्ञानापेक्षाही घातक असते. यास्तव या भ्रामक व मिथ्या ज्ञानाचा निरास करून अशा विस्तृत विषयाचे सूक्ष्म व खरे ज्ञान करून देणे, हें कांहीं एक दोन पाने मजकूर लिहून होण्यासारखें नाहीं, व तो या लेखांचा मुख्य विषयही नव्हे, या करितां तें काम विद्वान व देशहिताची कळकळ बाळगणा-या महात्म्यांनी हाती घ्यावे, अशी माझी त्यांस विनंति आहे. गृहस्थाच्या प्रापंचिकव्यवहाराचे तरुण होतकरू गृहस्थांस निवेदन करीत असतां, लेखनौघानें प्राप्त झालेल्या ह्या अप्रकृत विषयाचे केवळ त्याच्या महत्वा करितांच येथे इतक्या पाल्हाळाने विवरण केले, परंतु ते आतां, ‘मिंय्या मूठभर व दाढी हातभर’असे हास्यास्पद होण्याच्या बेतांत आले आहे. । यास्तव देशहिताबद्दल येथे संक्षेपाने इतकेच सुचवितों कीं, सांपत अज्ञानाने लोकसमुदाय फारच अदूरदर्शी होऊन, ज्यास त्यास आपली बायको व मुले, ह्यांच्या पलीकडे
पान:व्यवहारपद्धति.pdf/193
Appearance