पान:व्यवहारपद्धति.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ . ] बलाबल विचार. ९५

शिखरावर अथवा झाडझुडुप नाहीं, अशा निर्जन अरण्यांत जाऊन मसलतीचा बेत ठरविल्यास, तो बाहेर फुटण्याचे भय रहात नाहीं.

इतकी खबरदारी घेतली तरी देखील बोलणेंचालणे व मुखचर्या इत्यादिकांत अंतर्गत मसलतीचे प्रतिबिंब दिसून येते, व त्यावरून चतुरै पुरुष मसलतीचा घाटे तकनें तेव्हांच ताडितात. साक्षात् गोष्ट कानी पडल्यावर पशूनां देखील समजते, मग मनुष्यास समजली तर न्वल काय ! ह्याकरितां बोलणेंचालणे व मुखचर्या यांतही मसलतीचे प्रतिबिंब दिसू देऊ नये.

इतकी काळजी घेऊनही प्रसंगवशात् मसलत फुटली तरी देखील न कचरतां मोठ्या कुशलतेने तीवर झाकण |


१ आकारछाद्यमानापि न शक्यो विनिगुहितुम्। बलाद्धि विवृणोस्यैव भावमन्तर्गतं नृणाम् ॥ ६४ रामायण. युद्ध. सर्ग १.७

२ उदीरितार्थः पशुनापिगृह्यते हयाश्च नागाश्च वहन्ति देशिताः ।

अनुक्तमप्यूहति पण्डितो जनः परेंगितज्ञानफला हि बुद्धयः।-- हितोपदेश |

३ कोररिंगितैर्गत्या चष्टया भाषणेन च ।

नेत्रवत्क्रविकारेण लश्तेंतर्गतं मनः ।।
वर्णाकार प्रतिध्वानैश्वत्क्रविकारतः ।
अप्यूहन्ति मनो/ धीरास्तस्माद्रहसि मन्त्रयेत् । -- हितोपदेश

ससेंच, रामचंद्र भरतास विचारतात-

कच्चिन्नतनँयुक्तया वा ये चाप्यपरिकीर्तिता ।
त्वया वा तव वामात्यैर्बुद्धचते तात मन्त्रिनम्. ॥ २१ -- रामायण. अयोध्याकाण्ड, सर्ग. १००