पान:व्यवहारपद्धति.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ | व्यवहार पद्धति. [ प्रकरण त्याचप्रमाणे ज्या मसलतीविषयी सर्व मंत्र्यांचे तत्काळ एकमत होते, ती उत्तम मसलत, जी विषयीं मंत्र्यांचा प्रथमतः मतभेद होऊन मागून एकवाक्यता होते, ती मध्यम मसलत, व जिच्याविषयी मंत्र्यांचा वाद्विवाद चालून एकमतानें कांहीं निश्चित ठरत नाहीं, ती वाईट मसलत समजावी. मसलतीचा विचार फार गुप्त रीतीने करावा. ज्या पुरुषाचे भावी कार्य अथवा भावी कार्याविषयी केलेला विचार, दुस-याच्या समजण्यांत न येतां, योजिलेले कार्य पार पडल्यानंतर ते इतरांच्या ध्यानीं येते, त्यालाच शाहणा सणावें. मंत्रबीज फुटले तर ते रुजत नाहीं, याकरितां घरांत जेथे माणसाची वाग नाहीं, अशा ठिकाणी भिंतीस कान असतात, अशी कल्पना करून हलक्या शब्दानें मसलतीची वाटाघाट करावी. किंवा पर्वताच्या १ यस्य कृत्यं न जानन्ति मन्त्रं वा मन्त्रितं पर । कृतमेवास्य जानन्ति सवै पण्डित उच्यते ।। ३३ ।। उद्योगपर्व, अ० ३३. | २ मन्त्रबीजमिदं गुप्तं रक्षणीयं यथातथा । मनागपि न भियत तद्भिन्नं न प्ररोहति ।। हितोपदेश | | धर्मकामार्थकार्याणि तथा मन्त्रो न भिद्यते । गिरिपृष्ठमुपारुह्य प्रासाद वा रहो गतः ।। १२ ।। अरण्ये निःशलाके वा तत्र मन्त्रोभिधीयते । नासुहृत्परमं मन्त्र भारताहेति वेदितुम् ॥ १८ ॥ उद्योगपर्व, अ० ३८.