पान:व्यवहारपद्धति.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९६ व्यवहारपद्धति. [ प्रकरण घालून परपक्षास संदेहांत पाडावे, व आपला डाव सई करावा. असें करील तो खरा मुत्सदी. संकट निघून गेल्यावर, ५ असे केले असते तर तसे झाले असते, व तसे केले असते तर असे झाले असते, अशा प्रकारचे पांडित्य कोण करीत नाहीं ! मसलत फुटली असतां तीवर झांकण घालतांना व घोर संनिपात झाला असता त्यावर उपचार करितांना मुत्सद्याची व वैद्याची बुद्धि कसास लागून गुणाची पारख होते. ज्याप्रमाणे वर्षाकालाच्या प्रारंभीं क्षितिजाशी लहान लहान ढग उत्पन्न होऊन ते अतिविरल असल्यामुळे प्रथमतः कोणाच्या नजरेस येत नाहीत, पण थोड्याच अवकाशाने लहान लहान ढगांचे मोठे काहूर जमून - शदिशा व्यापून जातात, व गडद अंधःकार पडून वारा व पाऊस ह्यांचा असह्य वर्षाव होऊ लागतो, व विजांचे कोरड फुटू लागतात. अशा प्रसंगी मोठे धैर्यवान पुरुषही घाबरून जातात, मग इतरांचा काय पाड ! तद्तच जे खरे मुत्सदी असतात, ते प्रथमतः कार्याचा उपक्रम कोणाच्या ध्यानीं न येईल असा सूक्ष्म करून थोड्याच अवधींत शत्रूस आपल्या मसलतीच्या जाळ्यांत घेरून टाकतात व त्याची अक्कल गुंग करून सोडतात. १ मन्त्रिणां भिन्नसंधाने भिषजां सांनिपातके । कर्मणि व्यज्यते प्रज्ञा सुस्थे को वा न पण्डितः ।। हितोपदेश.