Jump to content

पान:व्यवहारपद्धति.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ह ३ . ] बलाबल विचार. ९३ रीतीने स्वार्थ साधण्याकरितां परार्थीची हानि करावयास चुकत नाहींत. | कांहीं लोक दुस-या लोकांसमक्ष आपला अभिमाय स्पष्टपणे सांगत नाहींत, व अनेकांश एककाली केलेल्या मसलतींत प्रसंगी मतभेद पडून आग्रहवाद उत्पन्न होतो, याकरितां सवड असल्यास प्रथमतः निरनिराळ्या मसलतगारांचा पृथक् पृथक् अभिप्राय घेऊन नंतर सर्वांसमवेत मंत्र निर्णय करावा. सवड नसेल तर प्रथमच सर्वांचा एकदम अभिप्राय घेतला तरी हरकत नाहीं. जो मनुष्य मंत्र्यांसमवेत मसलतीचा नीट ऊहापोह करून मग कार्यास उद्युक्त होतो, तो उत्तम पुरुष, जो आपल्याच बुद्धीने मसलतीचा इत्यर्थ ठरवून कार्यास हात घालतो, तो मध्यम पुरुष, व जो मुळींच विचार न करितां कार्यास प्रवृत्त होतो, तो नीच पुरुष समजावा. | १ त्रिविधाः पुरुषा लोके उत्तमाधममध्यमाः । तेषां तु समवेतानां गुणदोषौ वदाम्यहम् ।। ६ ।। मन्त्रखिभिर्हि संयुक्तः समर्थैर्मन्त्रनिर्ण ये । मित्रैर्वापि समानार्थबन्धवैरपि वाधिकैः ।। ७ ।। सहितोमन्त्रयित्वा यः कर्मारम्भान्प्रवर्तयेत् । दैवे च कुरुते यत्न तमाहुः पुरुषोत्तमम् ।। ८ ।। एकथं विमृशदेको धर्म प्रकुरुते मनः । एकः कायणि कुरुते तमाहुर्मध्यमं नरम् ।। ९ । गुणदोषो न निश्चित्य त्यक्त्वा दैवव्यपाश्रयम् । करिष्यामीति यः कार्यमुपेक्षेत्स नराधमः ।। १० ।। रामायण, युद्धकाण्ड, सर्ग ६