पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८४
वैयक्तिक व सामाजिक

येऊन जातात त्याचा आपल्याला पत्ताच लागत नाही. हे असेच चालले तर आणखीही नेपाळ, सीलोन, यांची अशीच आक्रमणे येतील यात शंकाच नाही. यामुळे मागल्या अकराव्या शतकातील इतिहासाची पुनरावृत्ती होईल की काय अशी शंका येते. म्हणून या वेळी सतराव्या शतकातील पुनरावृत्ती त्वरेने घडवून आणण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे आणि त्या प्रयत्नांना यश यावे अशी इच्छा असेल तर आपण अहोरात्र मंत्र जपला पाहिजे की, 'शिवरायाचे आठवावे रूप । शिवरायाचा आठवावा साक्षेप । शिव- रायाचा आठवावा प्रताप । भूमंडळीं ॥'