पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५६
वैयक्तिक व सामाजिक

ग्रंथातील 'गुजराथच्या इतिहासाचे पर्यालोचन' (पृ. २११), बहामनी राज्याचे समालोचन (पृ. २३८) आणि 'गतकालचे पर्यालोचन' (पृ. ३६०, ३६३, ३६६, ३६८, ३७२) ही प्रकरणे पाहावी. उत्तर हिंदुस्थानात हिंदू धर्म व हिंदू जाती यांचे जे भीषण शिरकाण झाले त्या मानाने दक्षिणेत कमी झाले इतकाच त्या थोर इतिहासपंडितांचा विधानांचा अर्थ घेतला पाहिजे. पण ते जे कमी प्रमाणाचे हत्याकांड होते तेच इतके भयंकर होते की हिंदवी स्वराज्याचा उद्घोष झाला नसता तर त्यानेच हिंदू जातीचे निर्मूलन झाले असते. दक्षिणेत हिंदुधर्माचा उच्छेद घडत नव्हता, धर्म या प्रकाराचे रक्षण करण्याची तीव्रता शिवाजीला भासावी अशी परिस्थितीच त्या काळी नव्हती, असे म्हणणे हे हिंदूंना मुस्लीम आक्रमणाचे स्वरूप अजूनहि कळलेले नाही, आणि बहुधा यापुढे कधीही त्याचे आकलन होण्याची शक्यता नाही याचे निदर्शक होय. शिवछत्रपतींचे अलौकिकत्व यात की त्यांनी त्या आक्रमणाचे स्वरूप बरोबर ओळखले होते. आणि 'हिंदवी स्वराज्य' हाच त्यावर उपाय होय हेही त्यांनी जाणले होते. म्हणून वयाच्या पंधराव्या वर्षीच या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचा महासंकल्प त्यांनी चित्तात केला होता. 'श्रीरोहिरेश्वर तुमचे खोरियांतील आदि कुलदेव, तुमचा डोंगरमाथा शेंद्रीलगत स्वयंभू आहे. त्यांणी आम्हास यश दिल्हे व पुढे तो सर्व मनोरथ हिंदवी स्वराज्य करून पुरविणार आहे' असा आत्मविश्वास छत्रपतींनी वैशाख शु॥ प्रतिपदा शके १५६७ (इ. स. १६४५) या शुभदिनी दादाजी नरसप्रभु देशपांडे यांना लिहिलेल्या पत्रात प्रगट केला आहे. येथून पुढे त्यांनी केलेल्या प्रत्येक कृतीतून आणि पत्रातून हिंदुपदपातशाहीचा संकल्प पुनः पुन्हा प्रगट होत असल्याचे दिसून येते. लोकांनाहि महाराजांच्या ह्या संकल्पाची चांगली जाणीव झाली होती. मिर्झा राजे जयसिंह यांची त्या काळी एकाने प्रशस्ति रचली आहे तीत 'दिल्लीच्या सिंहासनाची आकांक्षा बाळगणाऱ्या शिवाजीला त्याने जिंकले' असा त्याचा गौरव केला आहे. छत्रपतींनी आपले बंधु व्यंकोजी यास लिहिलेल्या पत्रात त्यांचे मानस अगदी स्पष्ट दिसते. ते म्हणतात, 'तुम्ही असा विचार करावा होता (करावयास हवा होता) की श्रीदेवाची व श्रीची कृपा त्यावरी (शिवछत्रपतीवर) पूर्ण आहे. दुष्ट तुरुकाला ते मारितात. मग आपल्या (व्यंकोजीच्या) सैन्यात तुरुक लोकच असता जय कैसा होतो, आणि तुरुक