पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६
वैयक्तिक व सामाजिक

जुलूम, हलगर्जीपणा, अनास्था दिसेल, तेथे तेथे तिच्यावर समाजशक्तीच्या साह्याने घाव घालण्यास प्रारंभ केला तर आपल्या समाजाला सध्या आलेली अवकळा नष्ट होईल आणि ध्येयवादी तरुण राष्ट्राला मिळतील. सध्या हे राष्ट्र अगदी वृद्ध होऊन गेले आहे. कारण तरुणांना आकृष्ट करणारा धर्मच येथे नाही. अमेरिका हे विज्ञानवाद, भौतिक आकांक्षा, सुखसमृद्धि या सर्व गोष्टींनी जगातले अग्रेसर राष्ट्र आहे, तरी पण धर्म ही शक्ती जिवंत ठेवण्याचे आटोकाट प्रयत्न तेथे केले जात आहेत. तेथील शिक्षणसंस्थांपैकी दोन- तृतीयांश संस्था धर्मसंघटनांच्या ताब्यात आहेत. आणि प्रत्येक धर्मसंघटना हे एक लहानसे विश्व आहे. या संघटना फक्त बौद्धिक शिक्षण देऊन थांबत नाहीत तर आपल्या सभासदांच्या सर्व प्रकारच्या उन्नतीची चिंता त्या वाहातात. प्रत्येक संस्थेची धर्ममंदिरे आहेत. आणि हजारो सभासद नित्य- नियमाने तेथे जातात. आपल्याकडे अजूनहि धर्ममंदिरे ही म्हाताऱ्यांच्यासाठी, बायकांच्यासाठी, संसार सोडून देण्याची तयारी करणारांच्यासाठीच असावी असे त्यांचे स्वरूप आहे. त्यामुळे धर्माचे संस्कार तरुण मनावर करण्याची कसलीहि सोय या धर्मभूमीत नाही. कोणते तरी आचार, कोणती तरी व्रते यांनी मानव बद्ध असणे अवश्य असते. आपल्या समाजातून जुन्या आचाराचे उच्चाटन झाले आहे. जुनी व्रते नष्ट झाली आहेत. म्हणजे त्यांवरची श्रद्धा गेली आहे. पण नवे आचार, नवी व्रते त्या ठिकाणी मुळीच आलेली नाहीत. पाश्चात्त्य देशात नवी व्रते, नवे आचार यांनी जीवन बद्ध करण्याचे कार्य या धर्मसंघटना करीत असतात. आणि या संघटना समाजाला नवी ध्येये, नवी क्षितिजे नित्य दाखवीत असल्यामुळे, व विज्ञान बुद्धिवाद, राष्ट्रीय प्रपंचाची प्रगति याला ते सर्व पोषक असल्यामुळे नवी पिढीहि अतिशय हौसेने, जुन्या निष्ठेने व श्रद्धेने नव्या आचारधर्माचे पालन करीत असते. यामुळे धर्मकार्यासाठी आत्मलिदान करणारे शेकडो-हजारो तरुण स्त्री-पुरुष तेथे कसे निर्माण होतात ते वर सांगितलेच आहे.
 लो. टिळकांनी धार्मिक महोत्सवांचे महत्त्व सांगताना म्हटले आहे की, "या उत्सवांचा आपण लोकशिक्षणासाठी उपयोग केला पाहिजे. आपली परिस्थिति काय आहे ते अशा उत्सवात जाऊन लोकांना सुशिक्षितांनी समजावून दिले पाहिजे. सरकार करीत असलेल्या जुलमांची आठवण त्या वेळी