पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४२
वैयक्तिक व सामाजिक

या सर्व शृंखला मानसिक असल्यामुळे बुद्धिप्रामाण्य, प्रत्यक्षनिष्ठ व प्रयोगक्षम विज्ञान, आणि विवेकी वृत्ती या शस्त्रांनीच त्या तोडता येतील.
 स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या दिव्य जीवनाचा विचार करता त्यातले अनेक रोमहर्षक प्रसंग आपल्या डोळ्यापुढे उभे राहतात. त्यांना हिंदुस्थानात घेऊन येणाऱ्या बोटीतून त्यांनी फ्रान्सच्या सागरात उडी फेकली तो प्रसंग त्या सर्वांत अत्यंत अद्भुतरसपूर्ण होय. पण माझ्या मते रत्नागिरीस त्यांनी जे सीमोल्लंघन केले ते त्यांचे हिंदुसमाजाला सर्वांत मोठे देणे होय. पहिल्या विक्रमाने त्यांनी पारतंत्र्याच्या शृंखलेवर घण घातला. पण दुसऱ्या विक्रमाने भारताच्या कपाळी ज्या शृंखलेमुळे पुन्हा पुन्हा पारतंत्र्य येत होते तिच्यावर घण घातला; आणि ती छिनून टाकली. पहिल्या विक्रमाने स्वातंत्र्यवीर स्वतः मृत्युंजय झाले, दुसऱ्याने हा हिंदुसमाजच मृत्युंजय होईल अशी आशा वाटते.