पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य ९३ अनुसरून, योगशास्त्राने प्रतिपादित ज्या मनाच्या पांच वृत्ति त्यांचे आह्मी ग्रहण करितों. सांख्यं योगः पंचरानं वेदाः पाशुपतं तथा । आत्म-प्रमाणानि एतानि न हन्तव्यानि हेतुभिः'। इति तत्-तत्-अभिहित-तत्-तत्-स्वरूपमात्रं अंगीकार्य, जिन-सुगत-अभिहित-तत्ववत् सर्वे न बहिsकार्यम् ॥ ( श्रीभाष्य, २।।४३ ) ह्मणजे, ६ सांख्यदर्शन, योगदर्शन, पंचरात्रदर्शन, वेदांतदर्शन व पाशुपतदर्शन हीं सर्व आत्मा सत्य आहे असे मानणारी असल्या मुळे, ती अनुः मानाच्या योगानें सर्वशः निराकृत करणे योग्य नव्हे. * या स्मृतिवचना वरून असे स्पष्ट होते की, या निरनिराळ्या दर्शनां मध्ये प्रतिपादन केलेले जे निरनिराळे मुख्य भाग, त्या सर्वांचे ग्रहण केले पाहिजे. जिन व बुद्ध यांनी प्रतिपादित मते ज्या प्रम में सर्वशः त्याज्य, त्या प्रमाणे ही सर्वशः त्याज्य नव्हत.' | वरील दोन्ही उताच्यां वरून असे नि:संशयपणे सिद्ध होते की, कोणत्याही मताचे ग्राह्यत्व किंवा अग्राह्यत्व निश्चित करण्या संबंधाने, शंकराचार्य व रामानुजाचार्य या दोघांच्याही मतें, जो प्रश्न अत्यंत महत्वाचा तो असा नव्हे की, ते मत कोणत्या प्रमाणाच्या योगाने स्थापन केलेले आहे, किंवा ते कोणत्या ग्रंथांत आहे, किंवा ते कोणी प्रतिप दन केळले आहे; तर एवढाच की, श्रुतिग्रंथांत उपदिष्ट असे जें परमार्थविषयक मत, त्या मताच्या ते विरुद्ध आहे किंवा अविरुद्ध आहे. जर किंवा ज्या मानाने ते मत श्रुतींतील परमार्थविषयक मताशी अविरुद्ध असेल, तर किंवा त्या मानाने ते मत ग्राह्य; जर किंवा ज्या मानाने ते विरुद्ध असेल,