पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९२ वैदिक तत्त्वमीमांसा हरकत नाहीं. तथापि तत्त्वज्ञान श्रुतिवचनां पासूनचे प्राप्त होणे शक्य आहे.' तर शंकराचार्य व रामानुजाचार्य यांचे मत असे की, ब्रह्मविषयक किंवा परमार्थविषयक सत्य सिद्धांत कोणते ? | हा मुख्य प्रश्न, श्रुतीच्या आधाराने त्यांना परमार्थ विषयक जे सिद्धांत सत्य वाटतात, तेच सिद्धांत जर कोणी तार्किक केवळ तकाच्या योगाने सिद्ध करून दाखवील, तर त्या सिद्धांतांना तर्कचा विटाळ झालेला आहे, एवढ्याच कारतां ते सिद्धांत त्याज्य असे ते ह्मणत नाहींत. आणि ह्मणूनच शंकराचार्यांनी झटले आहे की:--श्रुतिः हि वैदिकात् आत्म-एकत्व-विज्ञानात् अन्यत् निःश्रेयस-साधनं चारयति ।.... द्वैतिनः हि ते सांख्याः योगाः च, न आत्मएकत्व-दर्शिनः ।.... येन तु असेन न विरुध्येते तेन इष्टं एव सांख्य-योग-स्मृत्योः सावकाशत्वम् ।। ( शारीरक भाष्य, २।१।३ ) ह्मणजे, 4 अद्वितीय जो परमात्मा तत्-विषयक ज्ञाना शिवाय दुसन्या कोणत्याही साधनाने मुक्ति प्राप्त होणे शक्य नाही, असा श्रुती मध्ये उपदेश केलेला आहे. परंतु |साख्यवादी व योगवादी हे द्वैती असल्या मुळे त्यांना आत्मैकत्व मान्य नाही. तथापि त्यांच्या मताचा जो भाग वेदांत-- मताशी विरुद्ध नसेल, त्या भागाला जागा देणे किंवा तो भाग मान्य करणे हे आह्मांला इष्टच आहे.' * पर—मतं अप्रतिषिद्ध अनुमतं भवति' इति न्यायात् इह अपि योगशास्त्रप्रसिद्धाः मनसः पंचवृत्तयः परिगृह्यन्ते || ( शारीरक भाष्य, २।४।१२) ह्मणजे, * जर दुस-याचे मत आपल्या मताच्या विरुद्ध नसेल, तर त्याचे ग्रहण करावे, या नियमाला इ