पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९४ वैदिक तत्त्वमीमांसा । तर किंवा त्या मानाने ते अग्राह्य. या वरून असेही स्पष्ट होते की, श्रुतिग्रंथांचे ईश्वरप्रणीतत्व कबूल न करणारे असे जे अनुमानवादी, ते श्रुतीच्या आधारा शिवाय केवळ अनुमानादि प्रमाणांच्या योगाने ज्या पारमार्थिक विचारांचे प्रतिपादन करितात, ते विचार जर शंकराचार्य किंवा रामानुजाचार्य यांना मान्य. अशा पारमार्थिक विचारांशी एकरूप असतील, तर श्रुतिग्रंथ ईश्वरप्रणीत आहेत असे एक पक्ष मानितो, व ते ग्रंथ ईश्वरप्रणीत नव्हत असे दुसरा पक्ष मानितो, एवढ्याच मतभेदा मुळे या दोन पक्षां मध्ये विरोध किंवा तंटा असणे सयुक्तिक नव्हे. । । । । ।