पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९१ शंकराचार्य आणि रामानुजाचार्य (८) वरील विवेचना वरून असे स्पष्ट होते की, ब्रह्मविषयक ज्ञाना संबंधाने श्रुतिच प्रमाण, असे जे शंकराचार्य व रामानुजाचार्य ह्मणतात, त्याचा अर्थ असा नव्हे की, श्रुति प्रमाण मानली झणजे झालें, श्रुती मध्ये ब्रह्माचे जे लक्षण दिलेले आहे, ते कबूल नसले किंवा यथार्थपणे समजले नाही तरी चालेल. तर त्याचा अर्थ असा की, पूर्वी जे लक्षण निर्दिष्ट केलेले आहे तत्स्वरूप जें ब्रह्म ते सर्व जगाचे कारण होय, हा सिद्धांत सर्वथैव सत्य आहे असा त्यांचा मुख्य आग्रह. मात्र त्यांना असे वाटते की, हा सिद्धांत श्रुतीच्या आधारा शिवाय केवळ प्रत्यक्षादि प्रमाणांच्या योगाने सिद्ध केला जाणे शक्य नाहीं. आणि ह्मणून ते असे प्रतिपादन करतात की, तो सिद्धांत श्रुतीच्या साहाय्यानेच ज्ञेय आहे. जर कोणी तो सिद्धांत केवळ अनुमानादि प्रमाणांच्या योगाने सिद्ध करून दाखवील, तर त्याला त्यांची हरकत नाही. ते एवढेच ह्मणतात की, अद्यापपर्यंत या संबंधाने जे मी मी ह्मणणाच्या तार्किकां कडून प्रयत्न केले गेले आहेत, ते सफळ झालेले नाहीत; आणि असे प्रयत्न केव्हाही सफळ होतील असे त्यांना वाटत नाही. शंकराचार्यांच्या पुढील वाक्याचा हाच तात्पर्यार्थ आहेः–तानि अपि तर्क-उपपत्तिभ्यां तत्त्वज्ञानाय उपकुवन्ति इति चेत् , उपकुर्वन्तु नाम । तत्वज्ञानं तु वेदान्त-वाक्येभ्यः एव भवति.... ॥ ( शारी रक भाष्य, २।१।३ ) ह्मणजे, * जर सांख्यादि दर्शने अनुमानादिकांच्या योगानें तत्त्वज्ञाना विषयी निर्णय करण्याला साहाय्य करू शकतील तर त्यांनी ते करावे, त्याला आमची