पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९० वैदिक तत्त्वमीमांसा । जें ब्रह्म ते जगाचे कारण ह्मणून एका श्रुतिवचना मध्ये सांगितलेले आहे; त्या प्रमाणे तद्रूप ब्रह्म जगाचे कारण असेच इतर श्रुतिवचनां मध्ये देखील सांगितलेले आहे.' गति सामान्यं च वेदान्त–वाक्यानां ब्रह्म-कारणवादं प्रति विद्यते....इति-प्रपंचितं गतेन ग्रन्थेन । ( शारीरक भाष्य, १।४।१ ) सणजे, “ब्रह्म हे जगाचे कारण, असे प्रतिपादन करणे हा सर्व श्रुति-वाक्यांचा साधारण हेतु आहे, असेही या ग्रंथाच्या पूर्व भागांत प्रतिपादन केलेले आहे.' एतेन पाद-चतुष्टय–उक्त -न्याय-कलापेन सर्ववेदान्तेषु जगत्-कारण-प्रतिपादनपराः सर्वे वाक्य-विशेषाः ....सर्वज्ञ-सर्वशक्त-ब्रह्म-प्रतिपादनपराः व्याख्याताः ॥ ( श्रीभाष्य, १।४।२९ ) ह्मणजे, “ मागील चार पाद व त्यांतील विचारसरणी यांच्या योगाने असे प्रतिपादन केलेले आहे की, सर्व श्रुतिप्रंयां मध्ये जगाच्या कारणा संबंधाने जी वाक्ये आहेत त्या सर्वां मध्ये, सर्वज्ञ सर्वशक्ति असे जे ब्रह्म ते सर्व जगाचे कारण होय, असे निरूपण केले आहे.' | (१) शंकराचार्य व रामानुजाचार्य यांनी ईश्वरप्रणीत मानिलेले जे श्रुतिग्रंथ, त्यांतील धधर्मविषयक व ब्रह्मविषयक विचार सय आहेत किंवा असत्य आहेत, या विषयी जर विचार करावयाचा असेल तर,-वरील विषया संबंधाने जे विचार श्रुतप्रधांत आहेत असे त्यांनी प्रतिपादन केले आहे, तेच विचार त्या ग्रंथांत आहेत, असे गृहीत धरूनच तो विचार केला पाहिजे. कारण हा विचार करतांना, ते प्रतिपादन करितात तेच विचार श्रुतिग्रंथो मध्ये सर्वत्र आहेत किंवा नाहीत, या भाषाविषयक प्रश्नाचा विचार करणे हे सर्वथैव अन्यायच नव्हे तर अप्रासंगिक होय, असे सांगण्याची आवश्यकता नाही,