पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य ८९, यतः वै इमानि इत्यादि-वाक्यं निखिल–जगत्-एककारणं, निरस्त–निखिल-दोष-गन्धं, सार्वज्य-सत्यसंकल्पवादि-अनन्त-कल्याण-गुण-आकरं, अनवधिक-क्षति शय-आनन्दं ब्रह्म अस्ति इति बोधयति । ( श्रीभाष्य, १।१।४ ) ह्मणजे, “यतः वै इमानि इत्यादि श्रुतिवचना वरून असे सिद्ध होते की, ज्याच्या मध्ये कोणत्याह्न, दोषाचा किंचित् गंध देखील नाहीं, ज्याच्या मध्ये सर्वज्ञत्व सत्यसंकल्पत्व, इत्यादि अनंत कल्याणकारक गुण भरलेले आहेत, व जे आनंदमय आहे, असे ब्रह्म विद्यमान असून, ते सर्व जगाचे एकच कारण होय.' वरील उता-यां वरून ही गोष्ट स्पष्ट होते की, ब्रह्मविषयकज्ञाना संबंधाने श्रुति प्रमाणभूत मानिली पाहिजे, असे शंकराचार्य व रामानुजाचार्य यांनी प्रतिपादन केले आहे त्याचा अर्थ असा की, वरील उता-यांत जे लक्षण निर्दिष्ट केले आहे, तत्-स्वरूप जें ब्रह्म तें विद्यमान असून ते सर्व जगाच्या सर्व स्थितींचे एकच कारण होय, हा सिद्धांत सर्वथैव सत्य होय. वर सांगितलेल्या दोहोंपैकी ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ही की, शंकराचार्य व रामानुजाचार्य यांच्या मते श्रुती मध्ये जगाच्या कारणा विषय असे एकही वाक्य नाहीं की, त्यांत ब्रह्मा शिवाय दुसरें कांहीं जगाचे कारण आहे असे सांगितलेले आहेः-- यथाभूतः हि एकस्मिन् वेदान्ते सर्वज्ञः सर्वेश्वरः सर्वात्मकः अद्वितीयः कारणत्वेन व्यपदिष्टः, तथाभूतः एव वेदान्त-अन्तरेषु अपि व्यपदिश्यते ॥ ( शारीरकभाष्य, १।४।१४ ) झणजे, * ज्या प्रमाणे सर्वज्ञ, सर्वेश्वर, सर्वात्मा, अद्वितीय असे