पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८२ वैदिक तत्त्वमीमांसा ६ उपासनाविषयक जो उपदेश आहे ते सर्व, जै अविद्यावस्थे मध्ये आहेत, त्यांच्या करितां मात्र आहे. तसेच, उपासनाविषयक जे निरनिराळे प्रकार उपदिष्ट आहेत, त्यां पैकी कांहीं अभ्युदयाला साधनीभूत ह्मणून उपदिष्ट आहेत; दुसरे कांहीं प्रकार क्रमाक्रमाने मुक्ति प्राप्त होण्याला साधनीभूत ह्मणून उपदिष्ट आहेत; आणि इतर कांहीं प्रकार कम पासून प्राप्त होणारे जे सामर्थ्यरूप फळ, ते प्राप्त होण्याला साधनीभूत ह्मणून उपदिष्ट आहेत. अर्थातच, हा सर्व उपदेश प्रत्येकाने पाळावयाचा नाहीं; तर ज्याची जी इच्छा असेल त्या इच्छेला अनुरूप असा जो श्रुतिग्रंथां मध्ये उपदेश केलेला आहे, तेवढाच उपदेश त्याने पाळिला पाहिजे. । वरील उता-यांनी व्यक्त होणारे शंकराचार्यांचे मत रामानुजाचार्यांना मान्य होते असे श्रीभाष्यांतील पुढील सारख्या उता-यांनी सिद्ध होतेः–एवं आश्रमअन्तर–विधानात् ऋणश्रुतिः यावज्जीव-श्रुतिः अपवादश्रुतिः च अविरक्त-विषयाः एव इति वेदितव्याः । अन्याः च ब्रह्मविदः कर्मणां आप्रयाणात् अवश्य-कर्तव्यता-विधायिन्यः श्रुतयः स्मृतयः च स्व-स्व-आश्रम-धर्म-विषयाः ॥ ( श्रीभाष्य, ३।४।२० ) ह्मणजे, * निरनिराळे आश्रम विहित असल्या मुळे, ऋणश्रुति वगैरे कांहीं आचारविषयक श्रुति आहेत त्या, ज्यांनी गृहस्थाश्रमाचा त्याग केलेला नाही, त्यांना मात्र लागू आहेत. तसेच, ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावे अशी ज्यांना इच्छा असेल त्यांनी सर्व आयुष्यभर कर्मे केलीच पाहिजेत, अशा ज्या श्रुति व स्मृति आहेत, त्या देखील त्या