पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य ८३ त्या आश्रमा संबंधानेच आहेत, असे समजले पाहिजे.' अर्थात् , त्या इतर आश्रमांतील मनुष्यांना लागू नाहींत. | ( ६ ) श्रुतिग्रंथांतील आचरणविषयक उपदेशा संबंधानें जे हे शंकराचार्य व रामानुजाचार्य यांचे मत, त्याच्या संबंधाने असा प्रश्न उत्पन्न होते की, ज्याची जी इच्छा असेल त्या इच्छेला अनुरूप जो श्रुती मध्ये उपदेश केलेला आहे त्या उपदेशाला अनुसरून त्याने आचरण करावे, असे जर ते ह्मणतात, तर ज्याने त्याने आपापल्या इच्छे प्रमाणे वर्तन करावे, असा त्यांच्या ह्मणण्याचा अर्थ होत नाहीं काय ? या प्रश्नाला उतर असे की, त्यांच्या ह्मणण्याचा अर्थ याच्या अगदी उलट आहे. हे समजण्या करितां पहिली लक्षांत ठेत्रावयाची गोष्ट ही की, ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालें त्याला कोणताच विधिनिषेध लागू नाही, असे श्रुतिभ्रंथांत सांगितले आहे, हे जे शंकराचार्यांचे मत, त्याचा अर्थ असा नव्हे कीं, ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालें त्याला, लौकिक अर्थी, पाहिजे त्या प्रमाणे ' वागण्याची मोकळीक मिळते; तर असा की, लौकिक अर्थी, “ पाहिजे त्या प्रमाणे ' वर्तन त्याच्या कडून केले जाणे शक्य नसल्या मुळे, तसे वर्तन होऊ नये ह्मणून जी विधिनिषेधरूप बंधने आहेत, ती सर्व त्याच्या संबंधाने अनावश्यक होतातः--न च नियोगअभावात् सम्यक् दर्शिनः यथा-इष्ट-चेष्टा-प्रसंगः । सर्वत्र अभिमानस्य एवं प्रवर्तकत्वात् , अभिमान–अभावात् च सम्यक् दर्शिनः ॥ ( शारीरक भाष्य, २।३।४८) ह्मणजे, (१) कान्य कम विषयींचा उपदेश सर्वांना लागू नाहीं, अशा विषयीं श्रीभाष्यांतून उतारे देण्याची आवश्यकता नाह.