पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य पाहिजेत.' अर्थात् , ज्याला हे ज्ञान प्राप्त झालें त्याला श्रुतीताल आचरणविषयक उपदेश लागू नाही असे स्पष्ट झाले. वरील उता-यां वरून असे स्पष्ट होते की, श्रुतिग्रंथां मध्ये जो आचरणविषयक उपदेश आहे तो, ज्यांना आत्मज्ञान प्राप्त झालेले नाही, त्यांच्याच करितां आहे, ज्यांना ते ज्ञान प्राप्त झालेले आहे त्यांच्या करितां नव्हे, असे शंकराचार्यांचे मत. परंतु श्रुतिग्रंथां मध्ये जो आचरणविषयक उपदेश आहे तो सर्व, ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालेले नाही, अशा प्रत्येक मनुष्याने पाळिलाच पाहिजे असे शंकराचायचे मत नाहीं. उदाहरणार्थः-स्वर्गादि-आर्थिनः अग्निहोत्रादि-साधनं यथाभूतं उपदिशति ॥ ( शारीरक भाष्य, १।१।७) झणजे, ६ स्वर्ग वगैरे जीं सुखोपभागाचीं। साधने त्यां विषयी ज्यांना इच्छा असेल त्यांच्या करितां, अग्निहोत्रादि जी तत्-विषयक साधने, त्यां विषयीं उपदेश केलेला आहे. अर्थात् , ज्यांना स्वर्गादिप्राप्ती विषयी इच्छा नसेल त्यांनीं, तत्प्राप्त्यर्थ जी कमें उपदिष्ट आहेत, ती करू नये. ह्मणजे आचरणविषयक उपदेशाचा जो भाग काम्य कम संबंधाने आहे, तो प्रत्येक * अज्ञान मनुष्याला लागू आहे असे नाही. हीच गोष्ट पुढील वाक्यांत अधिक स्पष्ट करून सांगितलेली आहेः-तत्र अविद्या-अवस्थायां ब्रह्मणः उपास्य-उपासकादि-लक्षणः सर्वः व्यवहारः । तत्र कानिचित् ब्रह्मणः उपासनानि अभ्युदय–अर्थानि, कानिचित् क्रम-मुक्ति–अर्थानि, कानिचित् कर्म-समृद्धि-अथोनि॥ (शारीरक भाष्य, १।१।११) ह्मणजे,