पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८० वैदिक तत्त्वमीमांसा ते सर्वच सत्य नव्हत. आतां श्रुतिग्रंथांतील आचरणविषयक विचारांचा विचार करतांना ही गोष्ट लक्षात ठेविली पाहिजे की, त्या ग्रंथां मध्यें जो आचरणविषयक उपदेश आहे, तो सर्व प्रत्येक मनुष्याला अनुलक्षून आहे, असे शंकराचार्य किंवा रामानुजाचार्य प्रतिपादन करीत नाहींत. उलट, तो सर्व उपदेश प्रत्येक मनुष्याला अनुलक्षून नाहीं असेच ते दोघेही प्रतिपादन करितात. उदाहरणार्थः--* ब्राह्मणः। यजेत' इत्यादीनि शास्त्राणि आत्मनि वर्ण-आश्रम–वयःअवस्थादि-विशेष–अध्यासे आश्रित्य प्रवर्तन्ते ।। (शारीरक भाष्य, १।१।१ ) ह्मणजे, * ब्राह्मणाने यज्ञ करावा इत्यादि जे कर्मविषयक नियम ते,-वर्ण, आश्रम, वय, परिस्थिति यांचा आत्म्या वर केला जाणारा जो आरोप,-त्या आरोपा वर अवलंबून असतात. ' ह्मणजे ज्यांच्या कडून हा आरोप केला जात नाही त्यांच्या करितां ते नियम नव्हत, किंवा ते त्या नियमांनी बांधिले जात नाहींत. अलंकारः हि अयं अस्माकं, यत् ब्रह्म-आत्म-अवगतौ सत्य सर्व-कर्तव्यता-हानिः कृतकृत्यता च इति ॥ ( शारीरक भाष्य, १।१।४ ) ह्मणजे, * ब्रह्म व आत्मा यांच्या एकत्वा विषय ज्ञान प्राप्त झालें, ह्मणजे कृतकृत्यता होऊन या नंतर कोणतेही कर्तव्य शिल्लक राहत नाही, असे प्रतिपादन करणे हा वेदांताचा एक प्रशस्य भाग आहे. अहं ब्रह्म अस्मि इति एतत्-अवसानाः एव सर्वे विधयः ।। * शारीरक भाष्य, १।१।४ ) ह्मणजे, * मी ब्रह्म आहे असे ज्ञान प्राप्त होई पर्यंतच आचरणविषयक सर्व नियम पाळले