पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७९ शंकराचार्य आणि रामानुजाचार्य हाय्या शिवाय ) निर्णय करणे शक्य नाही. आणि ज्या अर्थी सृष्टि प्रत्यक्षादि प्रमाणांचा विषय आहे, त्या अर्थ सृष्टिविषयक ज्ञाना संबंधाने श्रुति प्रमाणभूत नव्हे. कारण बाह्य सृष्टि विषयी किंवा जीवात्म्या विषयीं निरूपण करणे हा श्रुतीचा हेतु नव्हेः-न हि अयं सृष्ट्यादि-प्रपंचः प्रतिपिपादयिषतः ॥ ( शारीरक भाष्य, ११४॥ १४ ) ह्मणजे, * सृष्ट पदार्थ वगैरे जो प्रपंच, त्या विषयीं प्रतिपादन करणे हा श्रुतीचा हेतु नव्हे. क्षेत्रज्ञः हि कर्तृत्वेन भोक्तृत्वेन च प्रतिशरीर बुद्धयादि-उपाधि-संबद्धः लोकतः एव प्रसिद्धः, ने असौ श्रुत्या तात्पर्येण विवक्ष्यते ॥ ( शारीरक भाष्य, १।३।७) ह्मणजे, “ कर्तृत्व भोक्तृत्व यांच्या योगाने प्रत्येक शरीरांत बुद्धि मन वगैरे उपाधींशीं बद्ध असा जो जीवात्मा, तो लौकिक साधनांनी य असल्या मुळे, त्याच्या विषय निरूपण करणे हा श्रुतीचा हेतु नव्हे. (२) | ( ६ ) वरील विवेचन ज्या मानाने निर्दोष असेल त्या मानाने असे स्पष्ट होते की, सृष्टिविषयक जी माहिती श्रुतिग्रंथां मध्ये आहे ती सर्वच निर्दोष नाहीं असे निश्चितपणे सिद्ध झाले, असे जरी कबूल करावे लागले तरी त्या मुळे, शंकराचार्य व रामानुजाचार्य यांनी प्रतिपादित जें श्रुतीचें ईश्वरप्रणीतत्व, त्याचे खंडन होत नाही. तर त्याचे खंडन करण्या करितां असें निश्चितपणे सिद्ध केले गेले पाहिजे की, श्रुती मध्ये जे आचरणविषयक व ब्रह्मविषयक विचार आहेत (१) या संबंधाने वरील १८-२० पृष्ठे पहा.