पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य ७५ १।१।३ ) ह्मणजे, ज्याच्या स्वरूपाचे वर विवेचन केलेले आहे असे जे ब्रहा, ते दुस-या कोणत्याही प्रमाणाचा विषय नसून केवळ श्रुतिरूप जे प्रमाणे त्या एकाच प्रमाणाचा विषय असल्या मुळे, “ यतो वा इमानि इत्यादि श्रुति-वचन ब्रह्मा विषयीं निरूपण करिते, असे सिद्ध झालें.' जगत्एक–कारणं परं ब्रह्म सकल-इतर-प्रमाण-अविषयतया शास्त्र-एक-प्रमाणक इति अभ्यधायि । (श्रीभाष्य, १॥२॥१॥ ह्मणजे, “आह्मीं असे प्रतिपादन केले आहे की, जगाचे ए कच कारण असे जे परब्रह्म, ते इतर कोणत्याही प्रमाणाचा विषय नसल्या मुळे, श्रुतिरूप जे प्रमाण त्या एका प्रमाणाचा मात्र विषय आहे. वेदान्त-वाक्यानां अतिक्रान्त-प्रत्यक्षादिसकल-इतर–प्रमाण–संभावना-भूमि-भूत-अर्थ- प्रतिपादन-परत्वात् ।। (श्रीभाष्य, २।१।१) ह्मणजे, “प्रत्यक्ष वगैरे जी इतर प्रमाणे त्यां पैक को गत्याही प्रमाणाने ज्या ज्ञेय नाहीत, अशा गोष्टींचे निरूपण करणे, हा श्रुतीचा हेतु होय.' वेदान्ताः तु अतिपतित-सकल-इतर-प्रमाण–संभावनाभूमिं....पुरुषोत्तम प्रतिपाद्य....॥ (श्रीभाष्य, ३।३।१) ह्मणजे, * इतर कोणत्याही प्रमाणाच्या योगाने गम्य नव्हे असा जो पुरुषोत्तम त्याच्या विषयी उपनिषदें प्रतिपादन करितात.' - वरील उताच्यां वरून असे नि:संशयपणे स्पष्ट होते की, ब्रह्म व धर्माधर्म या गोष्टी प्रत्यक्षादि जीं लौकिक प्रमाणे त्यांचे विषय नसल्या मुळे, त्यांचे श्रुती मध्ये निरूपण केलेले आहे; असे शंकराचार्य व रामानुजाचार्य हे दोघेही प्रतिपादन करतात. अर्थातच, या प्रतिपादना वरून असे अनुमान होते की, जर ब्रह्म व धर्माधर्म या गोष्टी प्रत्यक्षादि प्रमा