पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७६ वैदिक तत्त्वमीमांसा णांच्या योगानें ज्ञेय असल्या, तर त्यांचे निरूपण करण्या करितां ईश्वराने श्रुति निर्माण केली नसती. पुढील उतान्यां वरून हे अनुमान दृढ होते:-नने भूत-वस्तुत्व ब्रह्मणः प्रमाण-अन्तर—विषयत्वं एव इति वेदान्त–वाक्यविचारणा अनर्थका एव प्राप्ता । न । इन्द्रिय-अविषयत्वेन संबंध-अग्रहणात् ॥ ( शाररक भाष्य, १।१।२ ) ह्मणज, * कोणी असा आक्षेप घईल की, ज्या अर्थी ब्रह्म निश्चितस्वरूप आहे, त्या अर्थी ते प्रत्यक्षादि प्रमाणांचाच विषय असले पाहिजे. आणि या करितां उपनिषदांतील वचनांचे विवेचन करणें हें व्यर्थ होय. परंतु हा आक्षेप निराधार आहे. कारण ब्रह्म इंद्रियगोचर नसल्या मुळे, ते जगाचे कारण आहे ही गोष्ट प्रत्यक्षादि प्रमाणांच्या योगाने समजणे शक्य नाहीं । ( अर्थातच, जर ब्रह्म इतर प्रमाणांनी गम्य असते तर शंकराचार्यांच्या मते वरील आक्षेप कबूल करावा लागला असता. ) ईश्वर: तु लोकतः अप्रसिद्धत्वात् श्रुत्या तात्पर्येण विवक्ष्यते ।। (शारीरकभाष्य, १।३।७) ह्मणज • ईश्वर लौकिक ज्ञानसाधनांनी ज्ञेय नसल्या मुळे, त्याच्या विषयी निरूपण करणे हा श्रुतीचा हेतु होय. ' अर्थातच, जर ईश्वर लौकिक साधनांच्या योगानें ज्ञेय असता, तर त्याच्या विषयी निरूपण करण्याला श्रुति प्रवृत्त झाली नसती. ननु शास्त्रयानित्वं ब्रह्मणः न संभवति प्रमाण-अन्तर-वेद्यत्वात् ब्रह्मणः, अप्राप्ते तु शास्त्रं अर्थवत् । किं तर्हि तत्र प्रमाणम् ।.... न तावत् प्रत्यक्षम् । ....न अपि अनुमानम् ....। .००० अतः आगमात् ऋते कथं ईश्वरः सेत्स्यति ॥ ( श्री भाष्य, ११५३ ) ह्मणजे, “कोण असा आक्षेप घेईल की,