पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७४ । वैदिक तत्त्वमीमांसा ब्रह्मणः।तत् त्वं सि' इति ब्रह्म-आत्म-भावस्य शास्त्रं अन्तरैण अनवगम्यमानत्वात् ।। (शारीरक भाष्य, १।१।४ ,ह्मणजे, * जरी ब्रह्माचे स्वरूप परिनिष्ठित ह्मणजे निश्चित आहे, तरी ते प्रत्यक्षादि प्रमाणांचा विषय नव्हे. कारण ब्रह्म हे सर्व वस्तूंचा आत्मा आहे ही गोष्ट तत् त्वं असि एतत्-रूप उपनिषद्वचनाच्या साहाय्या शिवाय समजणे शक्य नाहीं. तत्वज्ञान तु वेदान्त-वाक्येभ्यः एव भवति ।। (शारीरकभाष्य, २।१।३) झणजे, * ब्रह्मविषयक ज्ञान श्रुति-वचनांच्या योग्ने मात्र उपलभ्य आहे.' अयं धर्मः अयं अधर्मः इति शास्त्रं एवं विज्ञान कारण म् । अतीन्द्रियत्वात् तयेाः ।। ( शारीरक भाष्य, ३।१।२६ ) ह्मणजे, कोणत्या प्रकारचे आचरण करणे ह्मणजे धर्म व कोणत्या प्रकारचे आचरण करणे ह्मणजे अधर्म, या गोष्टी श्रुतीच्या योगानेच समजण्या सारख्या आहेत. कारण त्या गोष्टी इद्रियगोचर नव्हत.' | हीच गोष्ट,-ह्मणजे परमार्थविषयक ज्ञान प्राप्त होण्याला श्रुती शिवाय दुसरे कोणतेही साधन नाही ही गोष्ट,- रामानुजाचार्यांनी देखील पुढील सारख्या ठिकाणी निर्दिष्ट केली आहेः-ब्रह्मणः अत्यन्त-अतीन्द्रियत्वेन प्रत्यक्षादिप्रमाण-अविषयतया, ब्रह्मणः शास्त्र-एक-प्रमाणकत्वात् ।। ( श्रीभाष्य, १।१।३ ) ह्मणजे, “ब्रह्म हे इंद्रियांना पूर्णपणे अगोचर असल्या मुळे, ते प्रत्यक्षादि प्रमाणांचा विषय होऊ शकत नाही. अर्थात् , ब्रह्म हें श्रुतीच्या योगाने मात्र गम्य आहे. अतः प्रमाण - अन्तर-अचरत्वेन शास्त्रएक-विषयत्वात् यतो वा इमानि इत्यादि-वाक्यं उक्तलक्षणं ब्रह्म प्रतिपादयति इति सिद्धम् ॥ ( श्रीभाष्य,