पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य ७३ ज्ञानसाधने त्यांच्या योगाने परमार्थविषयक ज्ञान प्राप्त होणे मुळीच शक्य नाहीं; या करितां परमार्थविषयक ज्ञाना सबधाने श्रुतीची आवश्यकता आह,-अर्थात् त्या ज्ञाना संबंधाने श्रुति प्रमाण मानिला पाहिजे, असे शंकराचार्य व रामानु जाचार्य या दोघांनीही स्पष्टपणे प्रतिपादन केले आहे. उदाहरणार्थ, शंकराचार्योनों असें ह्मटलें आहेः-वेदान्तवाक्य-कुसुम-ग्रथनार्थत्वात् सूत्राणाम् । वेदान्त–वाक्यानि हि सूत्रैः उदाहृत्य विचार्यन्ते । वाक्यार्थ-विचारणा–अध्य. वसान-निवेत्ता हि ब्रह्म-अवगतिः, न अनुमानादि-प्रमाणअन्तर-निवृत्त ।। (शारीरकभाष्य, १।१।२) ह्मणजे, उपनिषदांतील वाक्यरूप जी पुष्पें तीं एकत्र करणे एवढाच ब्रह्मसूत्रांचा हेतु आह. या करितां उपनिषदांतील वचने घेऊन त्यांचे सूत्रां मध्ये विवेचन केलेले आहे. कारण उपनिषदांतील वचः नांच्या अर्थाचे विवेचन केल्यानेच ब्रह्मविषयक ज्ञान प्राप्त होते; अनुमान वगैरे जी इतर प्रमाणे त्यांच्या योगाने ते ज्ञान प्राप्त होणे शक्य नाही,' शास्त्रात् एव प्रमाणात् जगतः जन्मादि-कारणं ब्रह्म अधिगम्यते ॥ ( शारीरक भाष्य, १।१।३) ह्मणजे, “ जगाच्या उत्पत्ति-स्थिति–ल्याचे कारण जें ब्रह्म, ते श्रुतीच्या योगानेच ३ । आहे.' तत् ब्रह्म सर्वज्ञ सर्व-शक्ति जगत्-उत्पात स्थिति-लय-कारणं वेदान्त-शास्त्रात् एव अवगम्यते ।। (शारीरकभाष्य, १।१।४) ह्मणजे, 'जगाच्या उत्पात्त-स्थिति–लयाचे कारण असे जें सर्वज्ञ सर्वशक्ति ब्रह्म ते श्रुतिग्रंथांच्या योगानेच जाग जाते. न च परिनिष्ठत-वस्तु–स्वरूपत्वे अपि प्रत्यक्षादि-विषयत्वं | (१) या निबंधाची पृष्ठे ४७-५७