पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६४ वैदिक तत्त्वमीमांसा स्वत:च्या परिश्रमाने ज्या ऋषींना विशेष शक्ति प्राप्त झाली, त्यांना श्रुतिग्रंथांतील शब्दरचने सहित विचार अंतर्ज्ञानाने उपलब्ध झाले. " श्रुतिग्रंथ ईश्वरप्रणीत आहेत, या सिद्धांताचा असाच अर्थ मानिला पाहिजे असे, वर निर्दिष्ट केलेल्या वचनांचा टीकाकार जो अर्थ करितात, त्या वरून स्पष्ट होते. उदाहरणार्थः-यज्ञेन पुण्येन कर्मणा वाचः वेदस्य पदवीयं मार्गयोग्यतां ग्रहणयोग्यतां आयन् आप्तवन्तः । ततः तां वाचं ऋषिषु प्रविष्टां विद्यमान अन्वविन्दन् अनुलब्धवन्तः याज्ञिकाः इति यावत् ॥ ( आनन्दगिरि ) यज्ञेन पूर्व-सुकृतेन वाचः वेदस्य लाभ-योग्यतां प्राप्ताः सन्तः याज्ञिकाः तां ऋषिषु स्थितां लब्धवन्तः इति मंत्रार्थः ।। (गोविम्दानन्द) • यज्ञेन वाचः' इत्यादि वचनाच्या या दोन्ही स्पष्टीकरणांचा तात्पर्यार्थ असा की, याज्ञिकांच्या पूर्व जन्मींच्या सुकृताने किंवा या जन्मींच्या पुण्यकर्मानें वेदांचे ग्रहण करण्याचे सामर्थ्य जेव्हां त्यांच्या मध्ये आले, तेव्हां ऋषीं पासून ते ह्मणजे वेद त्यांना प्राप्त झाले. या वचना संबंधाने लक्षात ठेवावयाची मुख्य गोष्ट ही की, याज्ञिकांना वेद उपलब्ध झाले ते, त्यांच्या परिश्रमांच्या व सुकृताच्या योगाने वेदग्रहण करण्याचे त्यांच्या मध्ये बुद्धिसामर्थ्य आल्या नंतर, त्यांना ऋषींच्या द्वारे प्राप्त झाले. अर्थात् ईश्वराने स्वतः ते वेद याज्ञिकांना लौकिक अर्थी दिले नाहीत किंवा शिकावले नाहीत. तर आतां प्रश्न असा की, ते वेद ऋषींना कसे प्राप्त झाले ?