पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य | - ६३ कर्माणि च पृथक् पृथक् । वेदशब्देभ्यः एव आदौ पृथक संस्था: च निर्ममे ' इति । संस्थाः संस्थानामि रूपाणि इति यावत् । .... अतः.... न.... वेदस्य आदिमत्वं प्रसज्यते । ( श्रीभाष्य, १।३।२७ ) ह्मणजे, * प्रजापतीने वेदाच्या योगानें सचेतन व अचेतन अशी जी नामरूपें तीं उत्पन्न केली. १६ स्वयंभूनें अनादि अनंत दिव्य अशी वेदरूप वाणी प्रथम उत्पन्न कैली; व तिच्या पासून सर्व भूत पदार्थ उत्पन्न झाले." * त्याने सर्वांची भिन्न भिन्न नांवें, कमें, व रूपें प्रथम वेदा पासूनच निर्माण केली.” * या वचनांत संस्थान ह्मणजे रूप असे समजले पाहिजे. वरील वचनां वरून वेद नित्य आहेत असे सिद्ध होते. | ( २ ) वेद अनादि किंवा नित्य आहेत, या सिद्धांताचे जें वर विवेचन केले आहे, त्या वरून प्रस्तुत विषया संबंधाने लक्षात ठेवावयाची दुसरी गोष्ट स्पष्ट होते. आणि ती ही कीं, श्रुतिग्रंथ ईश्वरप्रणीत आहेत, असे जे शंकराचार्य व रामानुजाचार्य प्रतिपादन करितात, त्याचा अर्थ असा नव्हे की, ज्या ग्रंथांना श्रुति असें ह्मणतात ते ग्रंथ ईश्वराने लिहून मनुष्याच्या स्वाधीन केले; किंवा त्या ग्रंथांत जे विचार समाविष्ट झालेले आहेत ते, गुरु शिष्याला किंवा उपदेशक श्रोत्यांना आपले विचार प्रगट करितो, त्या प्रमाणे ईश्वराने एका मनुष्याला किंवा मनुष्यसमुदायाला प्रगट केले; तर एवढाच की, ज्या प्रमाणे अलौकिक शक्तीने प्रेरित होऊन कवि काव्य,-हणजे त्या काव्यांतील विचारच नव्हत तर त्यांतील शब्द व शब्दरचना देखील, निर्माण करितो; त्या प्रमाणेच, ईश्वराच्या प्रसादाने ।