पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६५६ शंकराचार्य आणि रामानुजाचार्य युगान्ते अन्तर्हितान् । इत्यादि वरील दुस-या वचना वरून असे स्पष्ट होते की, प्रस्तुत युगाच्या आरंभी वेद प्रथम ऋषींना उपलब्ध झाले. अर्थात् , जर परमेश्वराने स्वतः ते कोणाला लौकिक अर्थी दिले किंवा शिकविले असतील, तर त्याने ते या ऋषींना दिले किंवा शिकविले असले पाहिजेत. इतर ऋषींच्या पूर्वी प्रजापतीला वेद मिळाले. ते त्याला कसे प्राप्त झाले ते पुढील स्पष्टीकरण वरून व्यक्त होते. * अनादि-निधना' इत्यादि, * नाम रूपं च ' इत्यादि, व * सर्वेषां तु ' इत्यादि, हीं जी तीन वचने वर दिली आहेत, त्यांचे स्पष्टीकरण करितांना शंकराचार्यांनी असे झटले आहेः-अपि च चिकीर्षितं अर्थ अनुतिष्ठन् , तस्य वाचकं शब्दं पूर्व स्मृत्वा पश्चात् तं अर्थ अनुतिष्ठति, इति सर्वेषां नः प्रत्यक्षं एतत् । तथा प्रजापतेः। अपि स्रष्टुः सृष्टेः पूर्वं वैदिकाः शब्दाः मनसि प्रादुर्बभूवुः । ‘पश्चात् तत्-अनुगतान् अर्थान् ससर्ज इति गम्यते ॥ ( शारीरक भाष्य, १।३।२८ ) ह्मणजे, १ कोणतीही गोष्ट करावी अशी आपणांला इच्छा झाली ह्मणजे त्या गोछीचा वाचक जो शब्द तो प्रथम आपल्या मनांत येतो व नंतर आपण ती गोष्ट करितों, असा आपला सर्वांचा अनुभव आहे. त्या प्रमाणेंच, प्रजापतिरूप जो सृष्टिकर्ता त्याच्या मनांत, सृष्टि उत्पन्न करण्याच्या पूर्वी, वेदरूप शब्द व्यक्त झाले; व नंतर त्यांना अनुसरून त्याने सृष्ट पदार्थ उत्पन्न केले. असे वरील वचनाचे तात्पर्य आहे. या वरून असे स्पष्ट होते की, प्रस्तुत युगांत जे वेद उपलब्ध झालेले आहेत ते या युगाच्या आरंभीं प्रथम प्रजापतीला