पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६२ वैदिक तत्त्वमीमासा आहेत या सिद्धांताचे समर्थन करण्या करितां आणखी आधारे दिलेले आहेत. उदाहरणार्थ, अशी एक ऋचा आहे कीं, ६ यज्ञाच्या योगाने वेदांच्या मार्गाचा शोध लागला; व ते ऋषी मध्ये प्रविष्ट झालेले असे उपलब् झाले. " या ऋचे वरून असे स्पष्ट होते की, पूर्वीच विद्यमान असलेले वेद पुनः उपलब्ध झाले. तसेच, व्यासांनी असे झटले आहे कीं, ५ युगाच्या शेवटीं इतिसस व वेद गुप्त झाले होते, ते परमेश्वराच्या प्रसादाने व तपाच्या योगानें ऋषींना प्रथम उपलब्ध झाले. ' पुनः श्रुती मध्ये असे एक वचन आहे की, ६६ ज्याने प्रजापतीला प्रथम उत्पन्न करून त्याला वेद दिले, व जो आपले स्वरूप बुद्धीच्या ठिकाणी प्रकाशित करितो, असा जो परमेश्वर त्याला, मुक्ति प्राप्त व्हावी या हेतूनें, मी शरण जातो. तसेच, शौनकादि ऋषींनी असे झटले आहे की, मधुच्छंद प्रभृति ऋषींना ऋग्वेदाच्या दहा मंडळांतील ऋचा प्रगट झाल्या. त्या प्रमाणेच, कांडे, सूक्ते, मंत्र, इत्यादि जै इतर वेदांचे भाग, ते देखील निरनिराळ्या ऋषींना प्रगट झाले," असे स्मृती मध्ये सांगितलेले आहे. | वेद नित्य आहेत असे रामानुजाचार्यांनी देखील पुढील सारख्या ठिकाणी स्पष्टपणे प्रतिपादन केले आहेः-* वेदेन । नामरूपे व्याकरोत् सतासंती प्रजापतिः ।.... अनादिनिधना हि एषा वाक् उत्सृष्टा स्वयंभुवा । आदौ वेदमयी । दिव्या, यतः सर्वाः प्रसूतयः ॥ * सर्वेषां तु संः नामानि । तास्वती=चित-अचिती रूपे