पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वैदिक तत्त्वमीमांसा कीं, श्रुतिग्रंथ ईश्वरप्रणीत आहेत अशी जी शंकराचार्य च रामानुजाचार्य यांची श्रद्धा, त्या श्रद्धेला वरील आक्षेप । लागू पडत नाही. कारण त्या दोघांच्याही मते श्रुतिग्रंथ । सृष्टीच्या आरंभा पासूनच विद्यमान आहेत, किंबहुना ते सृष्टी प्रमाणे अनादि आहेत. उदाहरणार्थ, शंकराचार्यांनी असे प्रतिपादन केले आहेः- ते हि शब्द-पूर्वी सृष्टि दर्शयतः । ........ तत्र तत्र शब्द-पूर्विका सृष्टिः श्राव्यते । स्मृतिः अपि । ॐ अनादि - निधना नित्या वाक् उत्सृष्टा स्वयंभुवा । आदौ वेदमयी । दिव्या यतः सर्वाः प्रवृत्तयः ॥ इति । उत्सर्गः अपि अयं वाचः संप्रदाय-प्रवर्तन-आत्मकः द्रष्टव्यः , अनादिनिधनायाः अन्यादृशस्य उत्सर्गस्य असंभवात् ॥ तथा। * नाम रूपं च भूतानां कर्मणां च प्रवर्तनम् । वेद-शब्भ्यः एव आदौ निर्ममे सः महेश्वरः । ॥ इति । * सर्वेषां तु सः नामानि कर्माणि च पृथक पृथक् । वेद शब्देभ्यः एव आदौ पृथक्-संस्थानाः च निमम । इति च ( शारीरक भाष्य, १।३।२८) ह्मणजे, * श्रुति व स्मृति या असे सांगतात की, सृष्टि उत्पन्न होण्याच्या पूर्वी वेद विद्यमान होते. ही गोष्ट श्रुती मध्ये ठिकठिकाणी सांगितलेली आढळते. स्मृती मध्ये देखील तसेच सांगितलेले आहे. उदाहरणार्थ, * स्वयंभूनें अनादि अनंत नित्य दिव्य अशी वेदरूप वाणी प्रथम निर्माण केली. व त्या वाणी पासून सर्व प्रवृत्त सुरू झाल्या. या वचनांतील उत्सर्ग ( निर्माण करणें ) या शब्दाचा अर्थ संप्रदायाचा आरंभ असाच केला पाहिजे. कारण अनादि अनंत अशी जी वेदरूप वाणी ती