पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य, ५९ (६) वरील विवेचना वरून निःसंशयपणे असे स्पष्ट होते की, शंकराचार्य व रामानुजाचार्य या दोघांच्याही मते श्रुतिग्रंथ ईश्वरप्रणीत असून ते, परमार्थविषयक आचरणा संबंधाने व ज्ञाना संबंधाने, सर्वथैव प्रमाणभूत मानिले पाहिजेत. आतां या मताचे खंडन किंवा मंडन करणे हा या निबंधाचा हेतु नव्हे. तथापि ते मत स्पष्टपणे समजण्या करितां व त्या संबंधाने गैर समज होऊं नये ह्मणून, पुढील गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. (१) इतर (उदाहरणार्थ, खिस्ती व महंमदी) धर्माच्या अनुयायांचा देखील, आपापल्या धर्माचे मूळ ग्रंथ (उदाहरणार्थ, बायबल व कुराण ) ईश्वरप्रणीत आहेत, अशी श्रद्धा असते. आतां या श्रद्धे संबंधानें तर्कवादी पक्षा कडून असा एक आक्षेप घेतला जातो की, जर ( उदाहरणार्थ ) बायबल किंवा कुराण या ग्रंथाच्या आधारा शिवाय परमार्थविषयक ज्ञान मिळविण्याला मनुष्याला दुसरे कांहीं साधन नाहीं; व या ज्ञाना शिवाय मनुष्याला परमार्थ प्राप्त होणे शक्य नसल्यामुळे पूर्ण दयाळु जो परमेश्वर त्याने स्वतः त्या ग्रंथांतील ज्ञान एका विवक्षित वेळीं मनुष्याला दिले; तर तो ग्रंथ निर्माण होण्याच्या पूर्वी,-ह्मणजे ख्रिस्ताचा किंवा महंमदाचा पृथ्वी वर अवतार होण्याच्या पूर्वी, परमेश्वराने मनुष्याला इतःततः भटकण्याची मोकळीक कशी दिली है या आक्षेपाला खिस्ती किंवा महंमदी लोकांचे उत्तर कांहीही असो, आपणांला या निबंधांत या उत्तराशी कांहीं कर्तव्य नाहीं. या संबंधाने आपण लक्षात ठेविली पाहिजे ती गोष्ट ही