पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५४ वैदिक तत्त्वमीमांसा एकरूपत्व नाही अशा विषया संबंधानें जें तकनै सिद्ध होणारे ज्ञान ते यथार्थ ज्ञान कसे असू शकेल? जर सर्व तर्कवादी असे कबूल करितील कीं, सर्व तार्किकां मध्ये कपिल श्रेष्ठ होय; तर कपिलाने प्रतिपादन केलेले मत म्हणजे यथार्थ ज्ञान असे आम्ही समजू. परंतु ही गोष्ट सर्व तर्कवादी कबूल करीत नाहीत, किंवा भूत भविष्य वर्तमान काळच्या सर्व तार्किकांची एका वेळीं व एका स्थळी सभा भरणे, ही गोष्ट जर शक्य असता, तर त्या सभे मध्ये जे मत मान्य असे ठरलें तें मत म्हणजे यथार्थ ज्ञान, असे समजतां आले असते. परंतु ही गोष्ट देखील शक्य नाहीं. उलट पक्षी, वेद नित्य असून यथार्थ ज्ञान प्राप्त करून देण्याच्याच उद्देशाने निर्माण झालेला आहे. आणि या साठी ज्या विषया संबंधाने वेदाच्या योगाने ज्ञान प्राप्त होते, तो विषय एकरूप असलाच पाहिजे. आणि वेदाच्या योगानें प्राप्त होणारे जे ज्ञान ते यथार्थ नव्हे असे, भूत भविष्य वर्तमान काळचे सई तर्कवादी एकत्र मिळाले तरी, त्यांच्याने सिद्ध करणार नाही. या वरून असे सिद्ध झालें कीं, उपनिषदां मध्ये उपदिष्ट जें ज्ञान ते मात्र यथार्थ ज्ञान होय, अर्थात् , दुस-या कोणत्याही प्रमाणानें प्राप्त होणारे जें ज्ञान ते अयथार्थ असल्या मुळे, त्या ज्ञानाच्या योगाने संसारा पासून मुक्त होणे कोणालाही शक्य नाही.' सारांश, शंकराचार्यांचे मत असें कीं, परमार्थ-प्राप्तीचे एकच साधन जे ब्रह्मज्ञान, ते श्रुतिग्रंथरूप प्रमाणाच्या योगानेच प्राप्त होणे शक्य आहे; दुस-या कोणत्याही प्रम