पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य | ५३ त्वम् । अतः अन्यत्र सम्यक्-ज्ञानत्व-अनुपपत्तेः संसारअविमोक्षः एव प्रसज्येत ॥ ( शारीरकभाष्य, २।१।११ ) झणजे, “ तर्कवादी असें ह्मणेल तर ते बरोबर नाही. कारण जरी कांहीं विषय संबंधाने तर्काला कायमपणा असला, तथापि प्रस्तुत विषया संबंधानें तकला कायमपणा नसल्या मुळे, या विषया संबंधाने तर्कावर विश्वास ठेविला तर परमार्थ प्राप्त होणार नाहीं. परमार्थ-प्राप्तीचे साधन व अत्यंत गुह्य असे जे हे वस्तुस्वरूप, त्या विषयीं श्रुतीच्या साहाय्या शिवाय कल्पना करणे देखील अशक्य आहे. परंतु ज्यांनी ज्यांनी मोक्षविषयक उपदेश केलेला आहे त्या सर्वांचे असे मत आहे कीं, यथार्थ ज्ञानाने मुक्ति प्राप्त होते. आतां यथार्थ ज्ञान हे वस्तुस्वभावाने नियत असल्या मुळे ते एकरूप असले पाहिजे. कारण जिला एकरूपत्व आहे तीच सत्य स्वतु होय. व अशा वस्तू विषयांचे जे ज्ञान तेच यथार्थ ज्ञान, ही गोष्ट प्रसिद्ध आहे. उदाहरणार्थ, अग्नि उष्ण असते असे जे ज्ञान ते यथार्थ ज्ञान होय. असे असल्या मुळे यथार्थ ज्ञाना संबंधाने निरनिराळ्या मनुष्य मध्ये विसंवाद असणे संभवत नाही. परंतु तर्कावर स्थापन झालेलीं जी मते ती परस्परांशी विरुद्ध असल्या मुळे, त्यांच्या संबंधाने विसंवाद असतो ही गोष्ट सर्वांना माहीतच आहे. एका तार्किकानें जें यथार्थ ज्ञान असे प्रतिपादन केले, ते अयथार्थ होय असे दुसरा तार्किक प्रतिपादन करितो. व या दुस-या तार्किकानें जें यथार्थ ज्ञान असे प्रतिपादन केले, त्या ज्ञानाचे तिसरा तार्किक निराकरण करितो. ही गोष्ट प्रसिद्ध आहे. आणि जर ही गोष्ट खरी, तर ज्याला