पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४६ वैदिक तत्त्वमीमांसा अवलंबून राहत नाही.' अतः ऊर्ध्वरेतःसु च ब्रह्म-विद्याविधानात् विद्यातः पुरुषार्थः इति सिद्धम् ।। ( श्रीभाष्य, ३।४।२० ) ह्मणजे, ज्यांनी सर्व कर्माचा संन्यास केला पाहिजे असे जे परिव्राज-आश्रमी त्यांच्या संबंधानें ज्ञानविषयक उपदेश केलेला असल्या मुळे असे सिद्ध होते की, केवळ ज्ञानापासून पुरुषार्थ प्राप्त होतो. ' अर्थात्, ज्ञान हैं। कर्माचरणाचे अंग किंवा साधन नव्हे. । वरील विवेचनाच्या योगाने शंकराचार्य व रामानुजाचार्य यांच्या मधील तीन गोष्टी संबंधानें मतैक्य व्यक्त होते:- ( १ ) केवळ कर्माचरणाच्या योगाने मोक्ष किंवा पुरुषार्थ प्राप्त होणे शक्य नाहीं; ( २ ) परब्रह्मविषयक ज्ञानाच्या योगाने मेक्ष किंवा पुरुषार्थ प्राप्त होतो; आणि ( ३ ) परब्रह्मविषयक ज्ञान हे कर्माचरणाच्या द्वाराने, किंवा कमचरणाला साधनीभूत होऊन, मोक्ष किंवा पुरुषार्थ प्राप्त करून देत नाही, तर ते मोक्ष किंवा पुरुषार्थ प्राप्त होण्याचे प्रत्यक्ष व स्वःत्र साधन होय, आतां या ठिकाणी दोन प्रश्न उत्पन्न होतात. एक प्रश्न असा की, मोक्ष किंवा पुरुर्थ प्राप्त करून देणारे प्रत्यक्ष व स्वतंत्र साधन असें जें ब्रह्मविषयक ज्ञान, ते ब्रह्मज्ञान ह्मणजे काय व ते कसे प्राप्त होते? आणि दुसरा प्रश्न असा की, ज्या ब्रह्मा विषयांचे ज्ञान प्राप्त झाल्याने मोक्ष किंवा पुरुषार्थ प्राप्त होतो, त्या ब्रह्माचे स्वरूप किंवा लक्षण काय आहे, व तत्स्वरूप जें ब्रह्म त्या ब्रह्माचा मनुष्यप्राणी व सृष्टि बांच्या कार्य संबंध आहे ? या दोन प्रश्नां पैकी पहिला प्रश्न धर्मविषयक आहे, व दुसरा प्रश्न तत्त्वज्ञानविषयक आहे, असे सांग