पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४५ शंकराचार्य आणि रामानुजाचार्य षद्-वचनें कर्म करणारा जो जीवात्मा त्याच्या विषयीं यथार्थ ज्ञान करून देतात. अर्थातच, कर्त्यांची चित्तशुद्धि करून विद्या कर्माचरणाला साधनीभूत होते; ती स्वतंत्रपणे पुरुषार्थप्राप्तीचे साधन नव्हे. सारांश, कर्माचरणा पासूनच पुरुषार्थ प्राप्त होतो, व विद्या हैं कर्माचरणाचे साधन.' | एवं प्राप्ते प्रचक्ष्महे । ....विद्यातः एव पुरुषार्थः । कुतः। ०००.कर्मसु कर्तुः जीवात्.... अधिकस्य.... परस्य ब्रह्मणः वेद्यतया उपदेशात्, भगवतः बादरायणस्य विद्यातः फलं इति एवं एव मतम् । .... तस्मात् वेदन-उपदेशशब्देषु कर्तुः....गन्धः अपि न अस्ति, इति परम--पुरुषविषयायाः विद्यायाः तत्-प्राप्तिरूपं अमृतत्वं तत्र तत्र शूयमाणं फलं, इति विद्यातः पुरुषार्थः इति सुष्टु उक्तम् ॥ ( श्रीभाष्य, ३।४।८ ) झणजे, * याला उत्तर असे की, विद्येच्या योगानेच पुरुषार्थ प्राप्त होतो. कारण कर्मे करणाच्या जीवात्म्याहून श्रेष्ठ असें जें परब्रह्म त्या परब्रह्मा विषयी ज्ञान मिळवावे, असा श्रुती मध्ये उपदेश असल्या मुळे, विद्ये पासूनच पुरुषार्थ प्राप्त होतो, असेच भगवान् बादरायण प्रतिपादन करतात. ज्या श्रुति-वचनां मध्ये ज्ञाना संबंधाने उपदेश केलेला आहे, त्या वचनां मध्ये कर्मे करणारा जो जीवात्मा त्याच्या विषयी किंचित् देखील निर्देश केलेला नाही. या वरून असे सिद्ध होते की, परब्रह्मविषयक जें ज्ञान त्या ज्ञानाच्या योगानेच परब्रह्मप्राप्तिरूप में अमृतत्व तें प्राप्त होते. ' न तस्याः कर्म-संबन्ध-गन्धः अपि विद्यते ।। (श्रीभाष्य, ३।४।१२) ह्मणजे, 'पुरुषार्थ प्राप्त करून देण्या संबंधाने विद्या कर्माचरणावर तिळमात्र देखाळ