पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/274

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३७० वैदिक तत्त्वमीमांसा स्याही पक्षांतराचे अवलंबन केले तरी त्याला असेंच कबूल करावे लागेल कीं, अदृष्टाच्या योगानें परमाणू मधील मूळ कालि एक हारों शङ्कर एहीं, कार, एतर, अदए हैं चेतनारहित आहे. आणि सांख्यमताचे निराकरण करितांना आह्मी असे सिद्ध केले आहे कीं, चैतन्यरूप शक्ती कडून जिचे नियमन केले जात नाही, अशी चेतनारहित वस्तु कोणत्याही काय संबंधाने स्वतः स्वतंत्रपणे प्रवृत्त होत नाहीं, किंवा दुस-या कोणत्याही वस्तू मध्ये प्रवृत्ति उत्पन्न करूं शकत नाही. तसेच त्या स्थिती मध्ये जीवात्म्या कडून अदृष्टाचे नियमन केले जाणे शक्य नाहीं. कारण त्या स्थिती मध्ये ( परमाणुवादीच्या मते ) जीवात्म्याचे चैतन्य उत्पन्न झालेले नसल्या मुळे परमाणुं प्रमाणेच तो देखील चेतनारहितच असतो. आणि दुसरे असे की, जर अदृष्ट जीवात्म्याशीं संयुक्त असेल तर ते परमाणूंच्या मूळ गतीचे कारण असणे शक्य नाही. कारण जीवात्म्याचा परमाणूंशीं कांहीं संबंध नाही. आणि जरी असे गृहीत धरिलें कीं, अदृष्टयुक्त जो जीवात्मा त्याचा परमाशीं स्वभावतःच कांहीं संबंध आहे, तरी हा संबंध नित्य असल्या मुळे त्याच्या योगाने परमाणू मध्ये सतत गति उत्पन्न होत राहील. कारण नियमित वेळींच व नियमित काळ पर्यंतच गति उत्पन्न होऊ दणे, व नियमित वेळीं व नियमित काळ पर्यंत गति उत्पन्न होऊ न देणे, अशा प्रकारचे त्या गतीचे नियमन करप्याला समर्थ अशी (परमाणुवादीच्या मते) कोणतीच दुसरी शक्ति त्या वेळीं विद्यमान असत नाही. या प्रमाणे गति उत्पन्न प्याला समर्थ असे कोणतेही निश्चित कारण विद्यमान