पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/273

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य २६९ तीच गति त्यांच्या मध्ये उत्पन्न होणार नाहीं. आतां ही * गोष्ट कबूल करून परमाणुवादी जर असे ह्मणेल कीं, अंतस्थ प्रयत्न किंवा परमाणू वर कोणत्याही बाह्य शक्ति कडून केला जाणारा आघात, हा त्या गतीचे कारण; तर हे त्याचे ह्मणणे सयुक्तिक नव्हे. कारण त्या वेळीं ( ह्मणजे परमाणूंचा परस्परांशी संयोग होऊन सृष्टि उत्पन्न होण्याला आरंभ होण्या पूर्वी ) अशा प्रकारचे कारण विद्यमान असणे शक्य नसल्या मुळे, त्याच्या योगानें परमाणू मध्ये पूर्वोक्त गति उत्पन्न होणे शक्य नाही. कारण त्या स्थिती मध्ये ( झणजे उत्पत्तीच्या पूर्वी प्रळयस्थिती मध्ये ) जीवात्म्याचा धर्म जो प्रयत्न तो विद्यमान असणे शक्य नाही. कारण त्या वेळीं जीवात्म्याचे शरीर विद्यमान असत नाही. आणि शरीर उत्पन्न होऊन जेव्हां जीवात्म्याचा अंतःकरणाशी संयोग होईल तेव्हांच जीवात्म्याचा प्रयत्नरूप धर्म शक्य होतो. आणि याच कारणा मुळे आघात वगैरे जीं गति उत्पन्न होण्याची दृश्यमान कारणे त्यांच्या योगाने त्या स्थिती मध्ये परमाणू मध्ये गति उत्पन्न होणे शक्य नाहीं, कारण अशा प्रकारची सर्व कारणे जगाची उत्पात्त झाल्या नंतर अस्तित्वात येतात; व या कारतां जगाच्या उत्पत्तीला आरंभ होण्याच्या वेळची जी परमाणूंची गति, त्या गतीचीं ती कारणे असणे शक्य नाहीं. तर आतां परमाणुवादी कदाचित् असे ह्मणेल कीं, अदृष्टरूप कारणाच्या योगाने ही मूळ गति उत्पन्न होते. तथापि या संबंधाने देखील असा प्रश्न उत्पन्न होतो की, हे अदृष्ट जीवात्म्याशीं संयुक्त असते किंवा परमाणूंशीं ? आणि परमाणुवादीनें यां पैकी कोण