पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/275

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य १७१ नसल्या मुळे, परमाणू मध्ये मूळ गति उत्पन्न होणे शक्य नाहीं. आणि ती मूळ गति उत्पन्न होणे शक्य नसल्या मुळे, त्या गतीच्या योगानें उत्पन्न होणारा जो परमाणूंचा परस्परांशी संयोग तो उत्पन्न होणे शक्य नाहीं. आणि ही संयोग उत्पन्न होणे शक्य नसल्या मुळे, त्या संयोगा। पासून उत्पन्न होणारी जी द्वयणुकादिक कार्ये ती उत्पन्न होणे शक्य नाही. तसेच, ज्या प्रमाणे उत्पत्तीच्या आरंभ परमाणूंचा परस्परांशी संयोग होण्याला आवश्यक अशी जी त्यांची गति ती उत्पन्न होण्याला कांहीं कारण नसल्या मुळे ती उत्पन्न होणे शक्य नाहीं; त्या प्रमाणेच प्रळयकाळ परमाणु परस्परांहून विभक्त होण्याला आवश्यक अशी जी त्यांची गति ती उत्पन्न होणे देखील शक्य नाहीं. कारण त्या गती संबंधाने देखील दृश्य असे कोणतेही कारण विद्यमान नाहीं, अदृष्टरूप कोरणा पासून देखील ही गति उत्पन्न होणे शक्य नाही. कारण अदृष्टा पासून केवळ सुखदुःखाचा अनुभव उत्पन्न होतो, प्रळयकाळ उत्पन्न होत नाही. या विवेचना वरून असे सिद्ध होते की, कोणतेही कारण विद्यमान नसल्या मुळे परमाणु परस्परांशीं संयुक्त होण्याला किंवा परस्परांहून विभक्त होण्याला आवश्यक अशी जी गति, ती उत्पन्न होणे शक्य नाही. ही गति उत्पन्न होणे शक्य नसल्या मुळे परमाणु परस्परांशीं संयुक्त किंवा परस्परांहून विभक्त होणे शक्य नाहीं. आणि त्या मुळे, त्यांच्या संयुक्तपणाच्या योगाने शक्य होणारी जी जगाची उत्पत्ति किंवा प्रळयस्थिति, ती अशक्य होते. अर्थातच, हा परमाणु क्लारणवाद सयुक्तिक नव्हे असे सिद्ध झाले.