पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/243

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| २३८ वैदिक तत्त्वमीमांसा चैतन्यरहित वस्तूंचीच आहे, असे मानले पाहिजे. कारण चैतन्यरहित वस्तु व त्यांच्या मध्ये असणारी प्रवृत्ति या दोन्ही गोष्टी आपणांला प्रत्यक्ष दिसतात; परंतु प्रवृत्तियुक्त अशी कोणतीही केवळ चैतन्यरूप वस्तु,-रथ वगैरे चैतन्य रहित वस्तु आपल्या दृष्टीला पडतात त्या प्रमाणे, केव्हाही आपल्या दृष्टीला पडत नाहीं. इतकेच नव्हे, तर प्रवृत्तियुक्त ज्या देह वगैरे चैतन्यरहित वस्तु त्यांच्याशी चैतन्यरूप वस्तूंचा संयोग झाला तरच त्यांच्या ( ह्मणजे चैतन्यरूप वस्तूंच्या ) अस्तित्वा विषयी आपणांला अनुमान करितां येते. कारण चैतन्यरूप वस्तूशीं संयुक्त असा जो जीवंत देह, तो रथ वगैरे चैतन्यरहित वस्तूंहून भिन्न प्रकारचा दिसतो. ( आणि या भिन्नते मुळे आपणांला हे अनु|मान करितां येते.) आणि असे असल्या मुळेच,-ह्मणजे देह प्रत्यक्ष दिसला तरच आपणांला चैतन्यविषयक ज्ञान प्राप्त होते, देहाच्या अभावीं तें प्राप्त होत नाही, आणि या कारणा मुळेच,-लोकायतिक असे मानतात कीं, चैतन्य हा देखील देहाचाच धर्म होय. या वरून असे सिद्ध होते की, प्रवृत्ति हा चैतन्यरहित वस्तूचाच धर्म आहे. या संबंधाने आह्मी असें ह्मणतों की, ज्या चैतन्यरहित वस्तू मध्ये जी प्रवृत्ति उत्पन्न झालेली दिसते ती प्रवृत्ति तिचा धर्म नव्हे असे आह्मी प्रतिपादन करीत नाहीं. ती प्रवृत्ति त्या वस्तूचाच धर्म असे आह्मी कबूल करितो. मात्र आह्मी असे प्रतिपादन करितों कीं, ती जी प्रवृत्ति उत्पन्न होते तिचे कारण चैतन्यरूप वस्तु. कारण चैतन्य विद्यमान असले व प्रवृत्ति विद्यमान असते, चैतन्याच्या अभावीं प्रवृत्ति